Majha Katta Madhur Bhandarkar: ''मी आणीबाणीवर इंदू सरकार हा चित्रपट बनवला होता. त्यावेळेला मला खूप त्रास झाला. 2017 मध्ये खूप याविरोधात प्रोटेस्ट करण्यात आले. त्यावेळी माझी मुलगी 13 वर्षांची होती. मला ती विचारत होती..मधुर भंडारकर मुर्दाबाद लोक का म्हणत आहेत? काय झालं? तेव्हा मी तिला सांगितलं, चित्रपट बनवला म्हणून असं झालं.'', असं प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर म्हणाला आहेत. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात मधुर भंडारकर याने उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्याने हा किस्सा सांगितला आहे. याबद्दलच बोलताना तो म्हणाला आहेत की, ''त्यावेळी मी एकटा होतो. त्यावेळी इंडस्ट्रीमधील कुठलाही व्यक्ती किंवा सेलिब्रेटी माझ्या स्पोर्टमध्ये आला नाही.'' 


Majha Katta Madhur Bhandarkar: इंडस्ट्रीममध्ये मी स्वतःच्या हिमतीवर नाव बनवलं  


मधुर भंडारकर म्हणाले की, चित्रपट सेन्सर झाली की, ती प्रदर्शित व्हायला पाहिजे. कारण सेन्सॉर बोर्डही ऑफिशिअल बॉडी आहे. पण त्यावेळी माझ्यासाठी कोणी आलं नाही. ज्यांना मी सपोर्ट केला, तेही आले नाही.  त्यांनी साधं ट्विटही केलं नाही की, मधुरसोबत जे होत आहे ते चुकीचं आहे. मीही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या नव्हत्या, तो म्हणाला, मला गर्व आहे की, मी स्वतः माझं करिअर बनवलं आहे. कोणाचाही सपोर्ट किंवा गॉडफादर शिवाय.. माझे जे प्रेक्षक आहेत, तेच माझे मोठे सपोर्ट आहेत.


Majha Katta Madhur Bhandarkar: मधुर भंडारकरच फक्त सहावीपर्यंतच झालं शिक्षण  


आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना मधुर भंडारकर म्हणाला की, ''माजी आई गृहिणी होती तर माझे वडील इलेक्ट्रीशन होते. आमच्या परिस्थिती त्या वेळी खूप वाईट होती. मात्र मला चित्रपट पाहण्याची खूप आवड होती. लहानपणी मला चित्रपटाची शूटिंग पाहण्याची खूप इच्छा होती.'' तो म्हणाला, घराची परिस्थिती वाईट असल्याने मी व्हिडीओ कॅसेटचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी मी सहावीत नापास झालो होतो. सहावीनंतर मी शिकलोच नाही. मात्र मात्र मी पुस्तक खूप वाचायची, विशेषतः इंग्रजी पुस्तकं. चित्रपटांबद्दल माझं खूप नॉलेज होत. यात स्टारडस्ट, फिल्मफेअर, अमर चित्रकथा अशी पुस्तकं खूप वाचायचो. मधुर भंडारकर पुढे म्हणाले, दोन-चार व्हिडीओ कॅसेटपासून मी व्यवसाय सुरु केला होता. चार वर्षानंतर माझ्याकडे 2 हजार व्हिडीओ कॅसेट होती. त्यावेळा मी इंडस्ट्रीला देखील व्हिडीओ कॅसेट पुरवत होतो आणि सायकलवर डिलिव्हरी करत होतो.