Shweta Tiwari :  छोट्या पडद्यावरील  'क्वीन' अशी ओळख असलेली अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे  नेहमीच चर्चेत असते. श्वेता तिवारीच्या सौंदर्यावर भाळणारे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता चाहत्यांच्या संपर्कात असते. आता, श्वेताने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.  इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज देताना आता आपण आणखी प्रतीक्षा करू शकत नसल्याचेही म्हटले आहे. 


श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावर चांगलीच लोकप्रिय आहे. तिच्या भूमिका असलेल्या मालिका  चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. 'कसोटी जिंदगी की' मधील प्रेरणा ही व्यक्तीरेखा अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.  श्वेता तिवारी काही रिएल्टी शोमध्येही सहभाग घेत आपली छाप सोडली आहे. 'बिग बॉस' या रिएल्टी शोची ती विजेती आहे. 


श्वेता तिवारीने काय म्हटले?


श्वेता तिवारीने तिच्या  इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझी भूमिका असलेल्या आगामी हिंदी कॉमेडी नाटक “एक मैं और एक टू” ची घोषणा करताना आनंद होत आहे. हशा आणि भावनांच्या रोलरकोस्टरसाठी सज्ज व्हा.'' असे श्वेताने म्हटले. 






''एक मैं और एक टू'' या हिंदी कॉमेडी नाटकांमध्ये श्वेता तिवारीसह सुरेश मेनन, नासिर वॉकर, श्वेता गुलाटी, किश्वर मर्चंट, सिद्धार्थ सागर  आदी कलाकारांची भूमिका आहे. 


श्वेताचे खासगी आयुष्यही चर्चेत...


श्वेता तिवारी  तिच्या फिटनेस आणि लूक्समुळे  चर्चेत असते.  पण तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असते. श्वेता तिवारी वयाच्या 18 व्या वर्षी राजा चौधरीसोबत लग्नबंधनात अडकली. त्यावेळी तिचं कुटुंब तिच्या निर्णयाविरोधात होतं. पण तरीही कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने राजा चौधरीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दोन वर्षानंतर श्वेता तिवारीने आपली लेक पलक तिवारीला जन्म दिला. लग्नाच्या काही वर्षातच श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांच्यात दुरावा आला. लग्नाच्या 9 वर्षानंतर श्वेता आणि राजा यांचा घटस्फोट झाला. 2007 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर श्वेताने एकटीनेच आपल्या लेकीचा सांभाळ केला. पुढे तिच्या आयुष्यात 2012 मध्ये अभिनव कोहलीची एन्ट्री झाली. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनवसोबत दुसरं लग्न केल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. 2019 मध्ये ती दुसऱ्या पतीपासूनही विभक्त झाली.