Priya Bapat:  मालिका, चित्रपट, वेब सीरिज आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. प्रियानं रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. प्रिया आणि उमेश कामत यांचे ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटाकच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच प्रियानं एक खास व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नाटकाची रिहर्सल करताना दिसत आहे.


प्रिया बापटनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं,  'रंगभूमीवर पुनरागमन करण्याचा माझा निर्णय योग्य होता. जसजसे माध्यम बदलले, तशी प्रक्रियाही बदलली. रंगभूमी म्हणजे देहबोली,  अभिनयात तीव्रता, ऊर्जा. सिनेमा आणि ओटीटी तंत्र शिकल्यानंतर पुन्हा रंगभूमीकडे वळणे हे थोडे आव्हान होते. पण फूल हाऊसमध्ये सादरीकरण करणे, प्रेक्षकांचे प्रेम अनुभवणे आणि त्यांच्या टाळ्या थेट ऐकणे - यासारखे काहीही नाही. सर्वांच्या प्रेमाबद्दल सदैव कृतज्ञ आहे.स्टेज मॅजिक तयार करण्याचा हा प्रवास अविस्मरणीय बनवणाऱ्या माझ्या अप्रतिम टीमला खूप शुभेच्छा.'


व्हिडीओमध्ये दिसते की, प्रिया म्हणाते, "मी जवळपास 13 वर्षांनी नाटक करत आहे. मी 2014 शेवटचा प्रयोग केला होता. मी खूप एक्सायटेड आहे.खूप नर्व्हसपण आहे."






प्रियानं शुभंकरोती, अधुरी एक कहानी आणि दामिनी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या हिंदी चित्रपटामध्ये प्रियानं महत्वाची भूमिका साकारली आहे. आता प्रियाचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होत आहेत. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामधील प्रिया आणि उमेश या जोडीचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. 






संबंधित बातम्या


Jar Tarchi Goshta : प्रिया बापट-उमेश कामतच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिल्याच प्रयोगाला झळकली ‘हाऊसफुल्ल’ची पाटी