Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अशोक मामा त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. अशोक सराफ हे अनेक नाटकांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अशोक मामांनी त्यांच्या एका विनोदी नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेला किस्सा सांगितला. 


जेव्हा विनोदी नाटकाच्या प्रयोगादरम्यान एकही प्रेक्षक हसत नव्हता


 
मज्जा या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांनी सांगितलं, "डार्लिंग डार्लिंग या नाटकात एकही असं वाक्य नाहीये  जे ऐकल्यानंतर प्रेक्षकांना हसायला येणार नाहीत. माळगावला आम्ही या नाटकाचा प्रयोग करत होतो. तेव्हा एक ओपन थिएटरमध्ये आम्ही तो प्रयोग करत होतो. सगळे प्रेक्षक हे फेटे घालून बसले होते. तेव्हा नाटकाच्या प्रयोगादरम्यान एकही प्रेक्षक हासत नव्हता. स्टेजवर एकच माईक होता. मी आणि राजा गोसावी स्टेजवर नाटक सादर करत होतो. तेव्हा राजा भाऊंनी स्टेजवरील माईक हातात घेतला नाटकाचे वाक्य बोलले. त्यानंतर त्यांनी माझ्या हातात माईक दिला आणि मला म्हणाले, "बोल" 


पुढे अशोक सराफ म्हणाले,  "आमच्या मदनाची मंजिरी नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान देखील असंच झालं होतं.  नांदेडला आम्ही एक प्रयोग केला होता. एका कॉन्ट्रॅक्टरने तो प्रयोग घेतला होता. ते कॉमेडी नाटक होतो. पण प्रयोगादरम्यान एकही माणूस हसत नव्हता. कॉन्ट्रॅक्टरला आमच्या नाटकाच्या टीममधील लोकांनी विचारलं,  प्रेक्षक हसत का नाहीत? त्यावर तो म्हणाला,  एकेकाला सांगून ठेवलं आहे की, कोणी हसायचं नाही."






अशोक सराफ यांनी 'या' चित्रपटांमध्ये केलं काम


आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी या  अशोक सराफ  यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील अशोक सराफ यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.'मी बहुरुपी’ या पुस्तकात अशोक सराफ यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ashok Saraf: लिटिल चॅम्प्सच्या मंचावर अशोक मामा झाले भावूक; व्हिडीओ व्हायरल