Nadav Lapid On The Kashmir Files: गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (iffi) समारोपाच्या कार्यक्रमात ज्युरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं होतं. हा चित्रपट वल्गर आणि प्रोपेगेंडा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. आता नदाव लॅपिड यांनी म्हटलं आहे की, काही लोकांना हा चांगला चित्रपट वाटतो हे मी स्वीकारतो . नदाव यांनी 'द काश्मीर फाइल्स' बाबत केलेल्या वक्तव्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या भूमिकेवर अनेकांनी टीका केली होती तर काहींनी या भूमिकेचं स्वागतही केलं होतं.  


मी जे केलं ते माझं कर्तव्य होतं- नदाल 


इंडिया टुडेशी संवाद साधताना नदाव लॅपिड यांनी म्हटलं आहे की, प्रचार किंवा प्रोपगेंडा म्हणजे काय हे कुणीही ठरवू शकत नाही? हे सत्य मी मान्य करतो. 'द काश्मीर फाइल्स' हा एक जबरदस्त चित्रपट आहे.   मी जे केलं ते माझं कर्तव्य होतं. नदाव म्हणाले की, मी जे त्यावेळी बोललो तोच दुसऱ्या ज्यूरींचा देखील अनुभव होता. मात्र त्यांनी यावर भाष्य केलं नाही. काही लोकांना ही ब्रिलियंट फिल्म वाटते हे मी स्वीकारतो, असं नदाव यांनी म्हटलं आहे. 


 त्याआधी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये नदाव यांनी म्हटलं होतं की, 'मला माहित होते की ही अशी घटना आहे, जी देशाशी संबंधित आहे. असे वक्तव्य करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा ते इस्राइल असल्याची कल्पना मी करत होतो. हे करण्याआधी मी घाबरलो होते तसेच मला अस्वस्थ देखील वाटत होते. हा चित्रपट पाहून मी अस्वस्थ झालो. या विषयांवर कोणीही बोलू इच्छित नाही, म्हणून मला याबाबत बोलावले लागले. कोणीतरी बोलणं गरजेचं होतं. माझ्या भाषणानंतर कार्यक्रमाला उपस्थित लोकांनी माझे आभारही मानले.'


नदाव लॅपिड हे पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. सिनोनिम्स (2019), द किंडरगार्डन टीचर (2014) आणि पुलीसमॅन (2011) या चित्रपटांमुळे नदाव लॅपिड यांना विशेष लोकप्रियता मिळाली. यापैकी नदाव लॅपिड यांना द किंडरगार्डन टीचर आणि पुलीसमॅन या चित्रपटांसाठी गोल्डन बेअर आणि कान्स ज्युरी पारितोषिकही मिळाले आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Nadav Lapid: 'द कश्मीर फाईल्स'ला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणारे नदाव लॅपिड आहेत कोण? जाणून घ्या