Pune International Film Festival: २४ व्या Pune International Film Festival मध्ये Marathi Cinema Today या विभागात प्रदर्शित झालेल्या 'सोहळा' (Sohala Movie) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. चित्रपट संपल्यानंतरही थिएटरमध्ये बराच वेळ प्रेक्षक आपापल्या जागेवर स्तब्ध बसून राहिले होते, सर्वत्र शांतता पसरली होती तर अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळत होते. (Pune news)

Continues below advertisement

काही जेष्ठ प्रेक्षकांसाठी हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील काही ठराविक नातेसंबंधातील ऊबेची आठवण करून देणारा ठरला, तर अनेक तरुण प्रेक्षक भावनिकदृष्ट्या पूर्णपणे हलून गेले. थिएटरबाहेर पडताना अनेकजण आमच्यासाठी हा आत्मसंवाद घडवून आणणारा क्षण असल्याचे म्हटले. 

चित्रपटाचे कथानक पश्या नावाच्या मुलाभोवती फिरते. बापाची चप्पल पायात येणं म्हणजे मुलगा वयात आला, समजूतदार झाला, असा एक साधारण जनमानस आपल्याकडे आहे, याला अनुसरूनच चित्रपटात दाखवलेल्या 'सुडकोली' गावात घरातील मुलगा किशोर वयात आल्यावर मोठा सोहळा पार पाडायची रीत दाखवली आहे.  अतिशय उत्साही, अंगी 'फिल्मी' किडा असलेला पश्या आपला 'सोहळा' जोरदार साजरा करण्याचे स्वप्न दिवसरात्र रंगवत राहतो, पण एका अनपेक्षित घटनेमुळे त्याचे बालपण क्षणार्धात संपते आणि अवखळ वयातच थोरलेपण त्याच्या वाट्याला येते. केवळ वय वाढल्याने मोठेपण अंगी येत नाही, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्यावरील जबाबदारीची जाणीव होणं, त्यानुरूप वागणुकीत बदल होणं यावरून माणसाच्या व्यक्तीमत्वात जी एक विलक्षण उभारी येते, याची कलात्मक अनुभूती साईकत बागबान यांनी आपल्या दिग्दर्शनाच्या पदार्पणातच 'सोहळा' चित्रपटात रेखाटली आहे. 

Continues below advertisement

चित्रपट अतिशय साधा परंतु तितकाच संवेदनशील आहे. चित्रपटात सर्वांचा अभिनय दमदार आहे. 'पश्या'च्या आईची भूमिका साकारणाऱ्या वर्षा मलवडकर या अभिनेत्रीचे काम अत्यंत प्रभावशाली व उल्लेखनीय आहे.

महत्वाच्या बातम्या:

थाटात पार पडला ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा