The Family Man : बऱ्याच दिवसांनी नेटकऱ्यांना प्रतीक्षा होती ती फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनची. कारण पहिला सीझन कमाल झाला होता. आता श्रीकांत तिवारी काय करणार याकडे अनेकांचं लक्ष होतं. ते असतानाच या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर आला आणि नेटकरी अक्षरश: वेडे झाले. हा दुसरा सीझन आला आणि लोकांनी या सीझनला डोक्यावर घेतलं. आता त्याच सर्वांसाठी आणखी एक चांगली बातमी अशी येते आहे की फॅमिली मॅनचा तिसरा सीझन आकाराला यायला सुरूवात झाली आहे. 


फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनला (Family Man 2) तोबा प्रतिसाद मिळाल्यानंतर लगेचंच या सीझनचे दिग्दर्शक राज आणि डीके यांनी तिसऱ्या सीझनची जुळवाजुळव सुरु केली. म्हणजे, ही तयारी फार आधीपासूनच चालू होती. पण आता ती प्रत्यक्षात कशी येईल याची चाचपणी सुरू झाली. फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता हा सीझन जोरात जाईल याची खात्री ओटीटी प्लॅटफॉर्मला पटली. म्हणूनच राज आणि डीके यांनी लगेच तिसऱ्या सीझनची कन्सेप्ट अॅमेझॉन प्राईमकडे सबमिट केली. सध्या राज आणि डीके यांचे दोन्ही सीझन कमाल हिट झाल्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सध्या हे दोघे ब्लू आईड बॉइज बनले आहेत. ही कन्सेप्ट लगेच या ओटीटी प्लॅटफॉर्मने मंजूर केली आहे. 


या तिसऱ्या सीझनची अधिकृत वाच्यता कुठेही नाहीय. मात्र काही वेबसाईट्सनी याचं वृत्त दिलं आहे. या तिसऱ्या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी चीनला अंगावर घेणार आहे. पहिल्या सीझनमध्ये पाकिस्तान,. दुसऱ्या सीझनमध्ये श्रीलंका आणि आता तिसऱ्या सीझनमध्ये चीनमध्ये हे कथानक घडणार आहे. सध्या कन्सेप्ट लॉक झाली आहे. अजून याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी होऊन याचा तिसरा सीझन यायला बहुधा 2022 चं वर्षाखेर उजाडेल असं दिसतं. पण एकूण फॅमिली मॅनच्या दोन्ही सीझनमध्ये असलेला अवधी पाहता आता तिसऱ्या सीझनसाठी नेटकरी आवर्जून थांबतील यात शंका नाही. 


संबंधित बातम्या :



फॅमिली मॅन 2 ची 'राजी' सामन्था अक्किनेनीने लग्नावर केले तब्बल 10 कोटी खर्च, साउथ सुपरस्टारच्या मुलाशी विवाह