Jana Nayagan box office collection:  साऊथ सुपरस्टार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय (Thalapathy Vijay) यांचा बहुप्रतिक्षि 'जना नायगन' हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा 23 जुलै रोजी सिनेमागृहात रिलीज करण्यात आला होता. या पॉलिटिकल अॅक्शन ड्रामा सिनेमाल सुरुवातीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण नंतर या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.  हा सिनेमा त्यांच्या सिने कारकिर्दीतील शेवटचा सिनेमा असल्याचं बोललं जात आहे. क्रिटिक्स तसेच प्रेक्षकांकडून या सिनेमाला उत्तम रिव्ह्यू मिळाला आहे.  ओपनिंग डेपासून 'जना नायगन' या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. दरम्यान, आता या सिनेमाच्या कमाईत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता सिनेमागृहात 'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे' रिलीज झाला आहे. हा सिनेमा 'जना नायगन'ला  बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर देत आहे.  दरम्यान, आतापर्यंत 'जना नायगन'ने किती कोटींचं कलेक्शन केलं? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

शनिवारी 'जना नायगन'ने किती कोटींचं कलेक्शन केलं? (Jana Nayagan box office collection Day 1)

विजयचे चाहते 'जना नायगन' बद्दल उत्सुक आहेतच,  पण त्याचा हा त्याच्या सिनेकारकिर्दीतील शेवटचा सिनेमा आहे, म्हणून भावुकही झाले आहेत. पण थलपती विजय यांनी  आपल्या चाहत्यांना निराश केलेलं नाही. 'जना नायगन' हा सिनेमा एक उत्तम सिनेमा आहे.  आता 'जना नायगन' चा शनिवारचा आकडा समोर आला आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  'जना नायगन'ने 10 व्या दिवशी  7.80 कोटींचं कलेक्शन केलं आहे. 

भारतात या सिनेमाची एकूण कमाई 164.90 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. 'जना नायगन' हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगु या तीन भाषांमध्ये  प्रदर्शित झाला आहे.   हिंदीसह इतर भाषांमध्ये या सिनेमाने उत्तम कामगिरी केली आहे. या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement

थलपती विजय व्यतिरिक्त  'जना नायगन' या सिनेमात बॉबी देओल, पूजा हेगडे, सत्यन सुर्यन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान, या सिनेमात  बॉबी देओलने नकारात्मक भूमिका साकारली आहे. नकारात्मक भूमिका साकारून बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या हा सिनेमा आपला बजेट वसूल करेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

दीपिका पदुकोण, विद्या बालन ते कतरिना कैफ; 'या' सुपरहिट अभिनेत्रींच्या बहि‍णींना पाहिलंत का? PHOTOS