West Zone Squad for Duleep Trophy 2026 : दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेसाठी वेस्ट झोनच्या संघाची सोमवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, मुंबईचा अष्टपैलू शम्स मुलाणी याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. यंदाची दुलीप ट्रॉफी 23 ऑगस्टपासून सुरू होणार असून, स्पर्धेसाठी वेस्ट झोनने अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधणारा संघ निवडला आहे. विशेष म्हणजे, या संघात मुंबईच्या तब्बल सहा खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे.

Continues below advertisement

मुंबईकडून शम्स मुलाणी, सरफराज खान, मुशीर खान, तनुष कोटियन, तुषार देशपांडे आणि शार्दुल ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत निवडकर्त्यांचा विश्वास संपादन केला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ आणि डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी यांना संघात स्थान मिळाले आहे. ऋतुराजवर नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आल्याने त्याच्याकडे संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे मोठे आव्हान असेल.

याशिवाय, सौराष्ट्रचा हार्विक देसाई, गुजरातचे उर्विल पटेल, जयमीत पटेल, शिवालिक शर्मा, सिद्धार्थ देसाई आणि अतित शेठ यांनाही संघात संधी देण्यात आली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंचा योग्य समतोल साधत वेस्ट झोनने मजबूत संघ उभा केला आहे. दुलीप ट्रॉफी ही भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंना भारत अ आणि वरिष्ठ भारतीय संघात संधी मिळत असते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतही अनेक युवा खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

Continues below advertisement

दुलीप ट्रॉफी साठी वेस्ट झोन स्क्वाड (West Zone Squad for Duleep Trophy 2026) :

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शम्स मुलाणी (उपकर्णधार), हार्विक देसाई, उर्विल पटेल, जयमीत पटेल, पृथ्वी शॉ, शिवालिक शर्मा, सिद्धार्थ देसाई, सरफराज खान, मुशीर खान, अतित शेठ, मुकेश चौधरी, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे.

दुलीप ट्रॉफी साठी साउथ झोन स्क्वाड (South Zone Squad For Duleep Trophy 2026) :

तिलक वर्मा (कर्णधार), रिकी भुई (उपकर्णधार), अभिनव तेजराना, एसके रशीद, के हिमतेजा, आर स्मरण, एन जगदीसन, करुण नायर, टी त्यागराजन, श्रेयस गोपाल, के साई तेजा, टी विजय, व्ही कवीरप्पा आणि अमन खान.

दुलीप ट्रॉफी साठी ईस्ट झोन स्क्वाड (East Zone Squad For Duleep Trophy 2026) :

इशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, सुदीप कुमार घारामी, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, शाहबाज अहमद, सूरज सिंधू जैस्वाल, विजय सिंह, कुमार कुशाग्र, शिखर मोहन, शुभांशु सेनापती, अभिजित सरकार, अनुकुल रॉय, दानिश दास.

दुलीप ट्रॉफी साठी सेंट्रल झोन स्क्वाड (Central Zone Squad For Duleep Trophy 2026) :

रजत पाटीदार (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), अमन मोखाडे, कोनील चंडेला, यश राठोड, आयुष पांडे, आर्यन जुयाल, कोनिल सिंग राठोड, सरांश जैन, हर्ष दुबे, अर्शद खान, जीशान अन्सारी, आर्यन पांडे, यश ठाकूर, निकेत भुते.

हे ही वाचा -

South Zone Squad for Duleep Trophy : मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर तिहेरी शतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad