Thalapathy Vijay : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय (Thalapathy Vijay) हा तब्बल 14 वर्षानंतर केरळमध्ये दाखल झाला. थलापती विजय हा आपला 'GOAT' (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) या चित्रपटासाठी तिरुवनंतपुरममध्ये पोहचला. विमानतळाबाहेर येताच चाहत्यांच्या गर्दीने त्याला घेरले. आपल्या आवडत्या सुपरस्टारची एक झलक पाहता यावी यासाठी चाहत्यांची धडपड सुरू होती. काही चाहते तर कारच्या बोनेटवर चढले. मात्र, पोलिसांनी विजयला कारमधून बाहेर काढले. या सगळ्या घडामोडीत विजयच्या कारची काच फुटली.
सोमवारी तिरुवनंतपुरमच्या रस्त्यावर थलपथी विजयचा जल्लोष झाला. चाहत्यांनी केलेल्या गर्दीमुळे विमानतळ ते हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर जाम होता. चाहत्यांच्या गर्दीने अभिनेत्याच्या गाडीला चारही बाजूंनी घेरले. उत्साह एवढा होता की पोलिसांचेही हाल झाले. या संपूर्ण घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. या संपूर्ण घटनेत थलपथी विजय यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून अनेक ठिकाणी डागही दिसत आहेत.
एअरपोर्टवर फोटो-व्हिडीओसाठी चढाओढ
विजयची एक झलक पाहता यावी यासाठी त्याच्या चाहत्यानी सकाळपासूनच एअरपोर्टवर गर्दी केली होती. सोशल मीडियावरदेखील #VijayStormHitsKerala आणि #TheGreatestOfAllTime हे दिवसभर ट्रेंड करत होते. संध्याकाळी विजय तिरुवनंतपुरममध्ये उतरला तेव्हा चाहत्यांनी एकच गोंधळ केला. विमानतळावर उपस्थित असलेले चाहते अभिनेत्याला जवळून पाहण्यासाठी उत्सुक असतानाच फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी एकच गर्दी उसळली.
रस्त्यावर वाहतूक कोंडी, कारच्या बोनेटवर चाहते
एका व्हिडिओमध्ये, विजयच्या कारला चाहत्यांनी घेरले आहे. कारमध्ये बसताच अभिनेत्याने चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले. यानंतर त्यांनी कारच्या सन रूफमधून बाहेर येऊन हस्तांदोलन केले आणि सर्वांचे आभार मानले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, विमानतळावरून बाहेर पडण्याचा मार्ग चाहत्यांच्या गर्दीने अडवून ठेवला.
...तर हा विजयचा हा शेवटचा चित्रपट, GOAT ठरणार शेवटचा चित्रपट
अभिनेता थलापती विजय आता राजकारणात प्रवेश करणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या विजय हे विजय वेंकट प्रभू यांच्या 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT) या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी केरळमध्ये दाखल झाला आहे. या ठिकाणी चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे चित्रीकरण पार पडणार आहे. राजकारणात प्रवेश करण्याआधी विजयचा हा शेवटचा असू शकतो.