Marathi Serial :  'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कलाकारांचे दमदार अभिनय आणि कथानक हे या मालिकेचं वेगळेपण ठरलं आहे. सध्या मालिकेत एक नाही तर दोन लग्नांची लगबग सुरु आहे. दादाच्या घरी मोठी बहीण तेजू हिचा साखरपुडा ठरला आहे. साखरपुड्यासाठी घरात  जोरदार तयारी सुरु आहे  सगळे उत्साहात आहेत. दादाचा आनंद गगनात मावत नाहीये. सूर्याच्या बहिणीच्या लग्नाची  तयारी पाहून जालंदरला स्वतःच्या मनाशी गाठ बांधतो की तेजश्रीच्या लग्नाआधी आपल्या घरात तुळजाचं लग्न धूमधडाक्यात व्हायला हवं. 

Continues below advertisement


 तुळजाचा भाऊ  शत्रुघ्न लोकांना गुंतवून ठेवतो आणि तेजूच्या लग्नात विघ्न आण्यासाठी  गोंधळ घालतो. ज्यामुळे सूर्या दादाची आई पळून गेली आहे  ह्यावर  चर्चा रंगते आणि तेजूचं लग्न मोडत. सूर्यादादाच्या घरात जेव्हा हे कळत तेव्हा संपूर्ण घर उध्वस्त होतं. जालिंदरच्या कानावर  ही बातमी पोहचते. दादाने सर्वांना या दु:खातून बाहेर काढायचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे गावात जत्रा आयोजित केली गेली आहे.  त्या जत्रेत तुळजा सूर्याला सांगते की तिला सत्यजितशी लग्न करायचं नाहीये आणि म्हणूनच ती ज्या जत्रेला जात आहे, तिथे तिला सूर्याची सोबत हवी आहे. हे ऐकून सूर्याने तुळजाला जत्रेला घेऊन जायचे ठरवलं आहे.


मालिकेचा प्रोमो प्रदर्शित


वाहिनीकडून मालिकेचा नवा प्रमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये तुळजा सूर्याला सांगते की तिला हे लग्न करायचं नाही. त्यावेळी सूर्या देखील तिला मदत करायचं ठरवतो. तुळजाला बघायला जेव्हा घरी मुलगा येतो त्यावेळी सूर्या पायऱ्यांवर तेल सांडतो. त्यावरुन सत्यजित घसरुन पडतो. दादा तेव्हा सूर्याला सत्यजितची मान ठीक करायला सांगतात. त्यावेळी सूर्या सत्यजितची मान चुकीच्या पद्धतीने मोडतो.  






 तुळजा तिच्या मनातलं सूर्यासमोर सांगू शकेल ? यामुळे सूर्याच्या स्वप्नाला नवीन पंख मिळतील ? सत्यजितशी लग्न न करायचा निर्णयामुळे काय असेल जालिंदरचा पुढचा डाव ? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका "लाखात एक आमचा दादा" दररोज रात्री 8.30 फक्त आपल्या झी मराठीवर.


ही बातमी वाचा : 


Amitabh Bachchan : ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा, अमिताभ लेकासाठी पोस्ट खास करत म्हणाले...