Zee Marathi New Serial : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी वाहिन्यांकडून आता नव्या मालिका सुरू करण्यात येणार आहेत. 'झी मराठी'वरील 'शिवा' आणि 'पारू' या दोन मालिकांच्या दमदार एन्ट्री नंतर आणखी दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत. या मालिका 18 मार्च पासून सुरू होणार आहेत.
'झी मराठी'वर नव्या मालिका सुरू होणार
मागील काही दिवसांपासून 'झी मराठी'वर दोन मालिकांचे प्रोमो सुरू होणार होते. या दोन मालिकांबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे या मालिका कधी आणि कोणत्या वेळेला प्रसारीत होणार, यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आता या दोन नव्या मालिकांची वेळ आणि दिवस जाहीर करण्यात आले आहेत.
झी मराठीवर दोन नव्या मराठी मालिका सुरू होणार आहे. येत्या 18 मार्चपासून या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका 18 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोज रात्री 10 वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी केली. या मालिकेत राकेश बापट, वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भुमिजा पाटील, सानिका काशीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
तर, 18 मार्चपासून ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका रात्री 9.30 वाजता दररोज प्रसारीत होणार आहे. अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
झी मराठीवर सुरू होणाऱ्या दोन्ही मालिका या रिमेक असल्याची चर्चा रंगली. पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका हिंदीमधील ‘पुनर्विवाह’ मालिकेचा रिमेक आहे. तर, ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ या मालिकेचा रिमेक ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या रुपाने मराठी छोट्या पडद्यावर येणार आहे.