Marathi Serial : 'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlerla) मालिका अनेक रंजक वळणं घेत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. अभिराम आणि लीलाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे.  नुकतंच वटपौर्णिमेला लीलाने एजेसाठी वडाच्या झाडाला 1001 प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा वाटलं की आता ह्यांचं नातं रुळावर येईल. पण एजे-लीलाच्या आयुष्यात सगळंच गोड गोड कसं असेल. पण हळूहळू एजे-लीलाच्या संसाराची गाडी पुढे सरकत आहे. नुकतच त्यांची रिसेप्शन पार्टी पार पडणार असून या रिसेप्शन पार्टीला पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतली वसुंधरा ही लीलाची मैत्रीण म्हणून हजेरी लावणार आहे. 

Continues below advertisement

लीला आणि एजे आजीच्या सांगण्यावरुन एका खोलीत राहायला तयार होतात. जे एकमेकांच्या नजरेलाही नजर देत नाहीत त्यांच्यासाठी एका खोलीत राहणे म्हणजे तारेवरची कसरत असणार. एजेला एसी शिवय जमत नाही  आणि  लीला बिचारी एसी मध्ये गारठून जाते. लीलाला आहे अंधाराची भीती तर एजेला उजेडात झोपायची सवय नाही.पण ही तर फक्त सुरुवात आहे ह्यांच्या इम्परफेक्ट संसाराची.

एजे-लीलाच्या रिसेप्शनचा दिवस

हे सर्व होत असताना एजे-लीलाच्या रिसेप्शनचा दिवस उजाडतो. लीलाला, कडक  सूचना मिळालेय की मीडिया समोर काहीही बोलायचे नाही. पण जिथे लीला आहे तिथे तर जे व्हायचे नाही ते होणारच, मीडियाने लीलाला प्रश्न विचारून इतकं भांभावून सोडलंय लीलाच्या तोंडून असं काही निघत की  सगळे हादरतात आणि तितक्यात एजे तिथे येतो. लीलाच्या रिसेप्शन मध्ये खास पाहुणी बनून लीलाची मैत्रीण वसुंधराही हजेरी लावणार आहे. 

Continues below advertisement

मालिकेमध्ये क्रॉसओव्हर

सध्या अनेक वाहिन्यांवर विविध मालिकांमधील कलाकार इतर मालिकांमध्ये पाहुणे म्हणून सहभागी होतात. आता झी मराठीवरही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळणार आहे. लीलाची मैत्रिणी म्हणून वसुंधराची हजेरी ही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.                                                          

ही बातमी वाचा : 

Sameer Vidwans : बॉलीवूडनंतर सहजीवनाच्या संसारात मराठी दिग्दर्शकाचं पदार्पण, समीर विद्वंस अडकला लग्नबंधनात