Yoigta Chavan Saorabh Choughule Wedding :  कलर्स मराठी (Colours Marathi) वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण (Yoigta Chavan) आणि अभिनेता सौरभ चौघुले (Saorabh Choughule) ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. योगिता आणि सौरभची ही ऑनस्क्रिन जोडी प्रेक्षकांच्या देखील तितकीट पसंतीस पडली. या ऑनस्क्रिन कपलने खऱ्या आयुष्यातही एकमेकांची जोडीदार म्हणून निवड केली आहे. योगिता आणि सौरभ हे दोघेही नुकतचे विवाहबंधनात अडकले आहे. 


योगिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांना ही गोड बातमी दिली. तसेच त्यांच्या चाहत्यांना देखील सुखद धक्का बसला आहे. योगिता आणि सौरभ यांचा विवाहसोहळ 3 मार्च रोजी पार पडला. नातेवाईक आणि मित्र मैत्रीणींच्या उपस्थितीत योगिता आणि सिद्धेशच्या लग्नसोहळा संपन्न झाला. योगिताने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकार मंडळींनी देखील कमेंट्स करत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


योगिताने शेअर केला लग्नाचा फोटो


योगिताने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं फॉरेव्हर हमसफर असं कॅप्शन दिलं आहे. योगिता आणि सौरभचा शाही विवाहसोहळा 3 मार्च रोजी पार पडला. सध्या मराठी कलाविश्वात लगीनसराई पाहायला मिळत आहे. त्यातच आता ही जोडीही लग्नबंधनात अडकल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा सुखद धक्का मिळाला आहे. 






योगिता आणि सौरभचा लग्नसोहळा


योगिता आणि सौरभ यांनी तु्झ्यात जीव गुंतला या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. योगिताने आणि सौरभच्या लग्नाच्या लूकची देखील तितकीच चर्चा सध्या होत आहे. योगिताने लाल रंगाची साडी आणि त्यावर हिरवी शॉल परिधान केली होती. तसेच सौरभने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि त्यावर हिरवा शेला परिधान केलाय. तसेच योगिताच्या पारंपारिक मंगळसूत्राने देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं. योगिता आणि सौरभने जीव माझा गुंतला या मालिकेत अंतरा आणि मल्हारचं पात्र साकारलं होतं. 


ही बातमी वाचा : 


Kushal Badrike : कुशल बद्रिकेही घेणार 'चला हवा येऊ द्या'चा निरोप? 'Thank You झी मराठी' म्हणत शेअर केलं भावनिक पत्र