Sundari : ‘सुंदरी’ (Sundari) मालिकेत एका मागोमाग एक अनपेक्षित घटना घडत आहेत. त्यामुळे प्रेक्षकही अतिशय मन लावून, कथेत रस घेऊन न चुकता ही मालिका पाहतात. प्रेक्षक या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसोबत जोडलेले आहेत हे त्यांच्या सोशल मिडीयाच्या कॉमेंट्सवरुन लक्षात येते. 


मालिकेत अनू आणि साहेब या दोन पात्रांची एक्झिट झाली आहे. आता पुढे काय, असा विचार अनेकांनी केलाच असेल आणि तेवढ्यात या मालिकेत नवीन एन्ट्री लगेच दिसून येते. अनेक मराठी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale) यांची ‘सुंदरी’मध्ये नवीन एन्ट्री होणार आहे.


सुंदरीच्या आयुष्यात नेमकं काय बदल घडणार?


वर्षा दांदळे साकारत असलेल्या पात्राच्या येण्यामुळे सुंदरीच्या आयुष्यात नेमकं काय बदल घडणार, त्यांच्या येण्याने सुंदरीचं आयुष्य सुरळित चालू राहणार की नवीन अडथळे निर्माण होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील. सुंदरीच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती सुख घेवून येईल की दुःख? असा प्रश्न मालिकाप्रेमींना पडला आहे.


आई आणि मुलीचं नातं हे जगावेगळं असतं. आईसोबत रक्ताचंच नातं असलं की त्यांच्या भावना ख-या असतात किंवा तेव्हाचं ते नातं टिकतं असं नसून आई या नात्याने आपुलकीने सांभाळ करणारी एखादी स्त्री पण ख-या आई इतकाच जीव बाळाला लावू शकते हा विचार 'सुंदरी' या मालिकेत मांडला गेला आहे. ‘सुंदरी’ मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवलं जाईल अशा घटना घडताना दाखवल्या आहेत. आता ‘सुंदरी’ ही मालिका पुन्हा एकदा नव्या वळणावर पोहचणार आहे.






'सुंदरी' मालिकेचे कथानक नवीन आहे. त्याचप्रमाणे नवीन कलाकार  देखील या मालिकेचा भाग आहेत. ‘सुंदरी’ची भूमिका अभिनेत्री आरती बिराजदारच साकारत असून अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री वनिता खरात हे दोन नवीन कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वीच वनिताची या मालिकेतून एक्झिट झाली आहे. नवीन कथा, नवीन कलाकार प्रेक्षकांची मालिकाप्रती उत्सुकता वाढवत आहेत.


संबंधित बातम्या


Vanita Kharat: ‘सुंदरी’ मालिकेत वनिता खरातची एन्ट्री; लूकनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, "फायर है तू"