Marathi Serial : मराठी मालिका विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


1. टीआरपीच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 43.4 रेटिंग मिळाले आहे. 


2. 'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 40.02 रेटिंग मिळाले आहे.  


3. टीआरपी लिस्टमध्ये 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 39.6 रेटिंग मिळाले आहे. 


4. 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. मालिकेतील नव्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेला 37.6 रेटिंग मिळाले आहे. 


5. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 35.04 रेटिंग मिळाले आहे. 


6. 'स्वाभीमान' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 34.1 रेटिंग मिळाले आहे. 


7. टीआरपीच्या शर्यतीत 'मन उडू उडू झालं' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 32.1 रेटिंग मिळाले आहे. 


8. 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 31.0 रेटिंग मिळाले आहे. 


9. नव्या स्थानावर 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका आहे. या मालिकेला 28.6 रेटिंग मिळाले आहे. 


10. 'लग्नाची बेडी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 27.6 रेटिंग मिळाले आहे. 


मागील आठवड्यात 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. आता ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर 'आई कुठे काय करते' ही मालिका होती. या आठवड्यात मात्र 'आई कुठे काय करते' ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. तसेच 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका मागच्या आठवड्यात सातव्या स्थानावर होती. या आठवड्यात मात्र या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. कारण या आठवड्यात टीआरपी रिपोर्टनुसार ही मालिका चौथ्या स्थानावर आहे.


संबंधित बातम्या


Majhi Tujhi Reshimgath : परीमुळे यशस्वी होणार यशची परदेशी कंपनीसोबतची डील; छोट्या परीचं होणार कौतुक


Me Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा' 14 मे दिवसापासून येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत अप्पू स्वीकारेल का शशांकचं प्रेम?