Bigg Boss Nikki Tamboli Crying : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पाचव्या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण, यातील एक स्पर्धकाची खूपच चर्चा आहे. बिग बॉसमुळे निक्की तांबोळी हा जणू घराघरांतील चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. निक्की तांबोळीने पहिल्या दिवसापासून बिग बॉस मराठीच्या घरात आपली छाप पाडल्याचं दिसत आहे. घरातील सदस्यांसोबत कचाकचा भांडणारी आणि सर्वांना रडवणारी निक्की बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली होती.


बिग बॉसच्या घरात आईला पाहून ढसाढसा रडली निक्की


बिग बॉस मराठी पाचव्या सीझनमध्ये सध्या इतर स्पर्धकांचा गेम निक्की तांबोळीच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात इतरांना रडवणारी निक्की बिग बॉसच्या घरात स्वत:ही रडली होती. बिग बॉस मराठीमध्ये साली होण्याआधी निक्की बिग बॉस हिंदी शोमध्ये सामील झाली होती. या शोमध्ये आईला पाहताच निक्कीचे अश्रू अनावर झाले होते. 


नेमकं काय घडलेलं?


बिग बॉस 14 व्या सीझनमध्ये निक्की तांबोळी स्पर्धक होती. या सीझनमध्ये ती दुसरी उपविजेती ठरली होती. याच सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आईची एन्ट्री दाखवण्यात आली होती. बिग बॉसच्या घरात आईला पाहताच निक्की तांबोळी ओक्साबोक्शी रडली होती. 






निक्की तांबोळी सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. सध्या निक्की विरोधात इतर सदस्य असं बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण असल्याचं दिसत आहे. यातून निक्की कसा मार्ग काढणार आणि स्वत:ला कसं सावरणार हे पाहण्यासाठी बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत.




 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nikki Tamboli : छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म ते थेट दाक्षिणात्य चित्रपटांत एन्ट्री; निक्की तांबोळीबदद्ल जाणून घ्या