मुंबई : अवघ्या देशाला याड लावणारा दिग्दर्शक नागराज मंजुळेचा 'सैराट'  सिनेमा लवकरच झी सिनेमा या वाहिनीवर दाखवला जाणार आहे. मात्र सिनेमाचं प्रमोशन करण्यास झी टीव्हीच्या कलाकारांनी नकार दिला आहे.


'सैराट'च्या प्रमोशनसाठी झी टीव्हीने झीच्या कलाकारांना  'झिंगाट' गाण्यावर डान्स  करुन त्याच्या व्हिडीओ पाठवण्यास  सांगितलं आहे. मात्र आम्ही सैराटचं प्रमोशन का करावं, असा प्रश्न कलाकार विचारत आहे. तर काही कलाकारांनी डान्स करण्यास  नकार दिला आहे.

त्यामुळे आता हे  कलाकार आपापल्या शोमध्ये 'झिंगाट' गाण्यावर डान्स करणार का? झी टीव्ही कलाकारांची झिंगाट डान्ससाठी मनधरणी करणार का?  हे लवकरच कळेल.

29 एप्रिल 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या 'सैराट'ने मराठीत सर्वाधिक कमाई केली होती. आर्ची आणि परशाची एपिक लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.