Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale  :  अवघ्या काही तासांमध्ये बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या (Bigg Boss Marathi Season 5) विजेत्याची घोषणा करण्यात येणार आहे. त्याआधीच बिग बॉसचा विजेता कोण होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीये. इतकच नव्हे तर अनेकांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झालीये. पण असं असतानाच ग्रँड फिनालेमधील एका डान्स परफॉर्मन्सने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 


वैभव चव्हाण आणि इरिना यांच्या नात्याची बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर तुफान चर्चा झाली. त्यानंतर आता बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या आधी त्यांच्या रोमँटीक डान्स व्हिडीओची तुफान चर्चा सुरु आहे. ग्रँड फिनालेच्या सोहळ्यात इरिना आणि वैभवची केमिस्ट्री पाहायला मिळाली. एका रोमँटीक मराठी गाण्यावर इरिना आणि वैभवने डान्स केला आहे.                                             


इरिनासोबतच्या नात्यावर वैभवचं भाष्य


वैभवने नुकतीच 2 कटींग या पॉडकास्टला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने त्याच्या आणि इरिनाच्या नात्यावर भाष्य केलं आहे. वैभवने म्हटलं की, 'आमचं असं काहीही नाहीये. तिचं तिचं एक वैयक्तिक आयुष्य आहे. माझं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे. त्यामुळे रिलेशनशिपच्या दृष्टीकोनातून आमचा बॉण्ड झाला आहे, असं काहीही नाहीये. आमचा तो बॉण्ड तयार होत गेला. जसं पत्रकार परिषदेमध्ये इतरांना विचारलं की, तुमची मैत्री फेक आहे की रिअल आहे,तसं आमच्याबद्दल विचारु शकत नाहीत. कारण जे काही होतं ते खरं होतं. '


पुढे वैभवने म्हटलं की, 'आमचा एक खरा बॉण्ड होता. जेवढी खरी मैत्री ठेवता आली तेवढी आम्ही ती ठेवली आणि ही बिग बॉसच्या घरातली एक खूप चांगली गोष्ट घडली आहे. फक्त हे नातं असंच राहावं अशी आमची इच्छा आहे. बाकी आमचं तसं काहीही नाहीये. तिच्याकडूनही नाही आणि माझ्याकडूनही नाहीये.' 






ही बातमी वाचा : 


Vaibhav Chavan : बारामतीचं वऱ्हाड रशियाला जाणार? इरिनासोबतच्या नात्यावर वैभवने केलं भाष्य, म्हणाला...