Vaalvi Marathi Movie World Television Premiere : 'वाळवी' (Vaalvi) हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर हा सिनेमा आता प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) होणार आहे. 


राघव म्हणतोय,"टीव्हीला वाळवी लागणार आहे"


झी मराठीच्या सोशल मीडिया पेज वर एक पोस्ट वायरल होत आहे. 'नवा गडी नवं राज्य' मालिकेच्या या प्रोमोमध्ये राघव अचानक वेगळचं वागत बोलत आहे. त्याच्या घरातील टीव्हीची तो जिवा पलीकडे काळजी घेत असतो. तो घरातील कोणालाच टीव्हीला हात सुद्धा लावू देत नाही. राघव आपली बहीण वर्षाला सुद्धा टीव्ही लावू नको असा बजावतो आणि या त्याच्या वागण्याचे वर्षा कारण विचारते, तर तो असे काहीतरी सांगतो की वर्षा सुद्धा गहन विचारात पडते.


राघव आपली बहीण वर्षाला सुद्धा टीव्ही लावू नको असा बजावतो आणि या त्याच्या वागण्याचे वर्षा कारण विचारते, तर तो असे काहीतरी सांगतो की वर्षा सुद्धा गहन विचारात पडते. परत वर्षा राघवला टीव्ही न लावायचं कारण विचारते तेव्हा राघव मोठ्या काळजी ने सांगतो की टीव्हीला जपायला हवे कारण टीव्हीला वाळवी लागणार आहे.






'वाळवी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. आता या सिनेमाचा 18 जूनला संध्याकाळी सात वाजता झी मराठीवर 'वर्ल्ड टीव्ही प्रीमियर' होणार आहे. वाळवीचे दिग्दर्शक परेश मोकाशी  यांनी 'एलिझाबेथ एकादशी', 'चि. व चि. सौ. का.' असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसाठी आणले होते. या चित्रपटांनी फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर रसिक प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं. 
 
'वाळवी' या सिनेमाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.  लाकडाला वाळवी लागली तर ती लाकूड पोखरून काढते याचप्रकारे जर नात्याला वाळवी लागली तर काय होते हे प्रेक्षकांना बघायला मिळेल. शेवट पर्यंत  खुर्चीला खिळवून ठेवणारा आणि अनेक गुपितं दडवून असलेला हा सिनेमा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल.


संबंधित बातम्या


Vaalvi: वाळवी ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या