Urmila Nimbalkar: युट्यूबर उर्मिला निंबाळकरच्या (Urmila Nimbalkar) युट्यूब चॅनलनं नुकताच एक मिलियन सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला आहे.  युट्यूबवर एक मिलियन सबस्क्रायबर्स झाल्यानंतर उर्मिलानं 'मला आलेलं डिप्रेशन ते एक मिलियन' हा व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून उर्मिलानं तिच्या युट्यूबर होण्याच्या प्रवासाची माहिती दिली. तसेच उर्मिलानं तिला आलेल्या डिप्रेशनबद्दल देखील या व्हिडीओमध्ये सांगितलं.

Continues below advertisement


उर्मिलानं सांगितला मालिकेचा किस्सा


उर्मिलानं तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं की. तिला एका मालिकेमधून काढून टाकण्यात आलं होतं. ती म्हणाली 'मला एका मालिकेतून काढून टाकलं होतं. त्या मालिकेतून मला काढलं हा माझ्यासाठी मोठा शॉक होता. एकदा मी मेकअप रुममध्ये गेले. कोणी माझ्याशी बोलत नव्हतं. त्यानंतर एक प्रोडक्शनमधली व्यक्ती आली आणि तिनं मला सांगितलं की, चॅनलनं निर्णय घेतलाय की, तुला काढलंय. त्यानंतर मला मी शून्य आहे, असं वाटत होतं. मी खूप रडले होते तेव्हा. मी प्रोडक्शनच्या एका ऑफिसमध्ये गेले. तेव्हा माझ्याकडून एका अशा पेपरवर सही करुन घेण्यात आली, ज्यामध्ये लिहिलं होतं की, तुझे हेल्थ इश्यू आहेत, त्यामुळे तू स्वत:हून मालिका सोडत आहेस. तेव्हा माझा आत्मविश्वास कमी झाला होता.'


उर्मिलानं पुढे सांगितलं, 'सगळ्यात वाईट तेव्हा वाटतं जेव्हा तुम्हाला वाटतं की, तुम्ही शून्य आहात.  एखादा माणूस डिप्रेशनमध्ये जातो हे तेव्हा कळत जेव्हा तो माणून बेसिक हायजिन सोडतो. मला कळत होतं की आपण मनानं आजारी पडतोय. मी तेव्हा स्वत:शीच बोलायचे. मला अजूनही आठवतंय की, मी स्वत:ला आरशात बघून मारायचे. मी तेव्हा स्वत:ला सांगायचे की,तू फालतू आहे. तेव्हा मारुन माझा गाल लाल व्हायचा.'






व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल देखील उर्मिलानं सांगितलं, 'मी सदाशिव पेठेमध्ये फिरत होते. तेव्हा मी पैठणीच्या दुकानं बघत होते. अस्सल पैठणी कशी ओळखाची? हे अनेकांना माहित नव्हतं. मी त्याबाबत सर्च केलं होतं, पण निट माहिती मिळत नव्हती.त्यानंतर मी पैठणीबाबत एक व्हिडीओ केला आणि तो व्हायरल झाला.'


महत्त्वाच्या बातम्या : 


Urmila Nimbalkar: स्वतःला जर्सी गाय म्हणत उर्मीलाने शेअर केले भन्नाट फोटो!