अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...
एबीपी माझा वेब टीम | 30 Oct 2017 11:25 PM (IST)
बजाओ हा शब्द पुरुषांसोबतच महिलाही वापरतात. विनोदाने हा शब्द अनौपचारिकरित्या वापरला जातो. असं ट्विंकलने ट्विटरवर लिहिलं आहे.
मुंबई : कॉमेडियन मल्लिका दुआ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यात सुरु असलेल्या वादात अक्षयची पत्नी आणि अभिनेत्री, लेखिका ट्विंकल खन्नालाही खेचण्यात आलं. 'काही जणांना विनोदही कळत नाहीत' असं म्हणत ट्विंकलने अक्षयकुमारची पाठराखण केली आहे. 'बजाओ हा शब्द पुरुषांसोबतच महिलाही वापरतात. विनोदाने हा शब्द अनौपचारिकरित्या वापरला जातो. मी त्याची वाजवणार आहे, असं अनेक जण म्हणतात. इतकंच काय, रेड एफएमची बजाते रहो अशी टॅगलाईन आहे. आणि यापैकी कुठल्याच ठिकाणी अश्लीलतेचा संबंधही नसतो.' असं ट्विंकलने ट्विटरवर लिहिलं आहे. द लाफ्टर चॅलेंजच्या सेटवर घडलेल्या काँट्रोव्हर्सीत मला खेचून आणल्यामुळे मला उत्तर द्यायचं आहे, असं म्हणत ट्विंकल भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. https://twitter.com/mrsfunnybones/status/924503377454813185 'मल्लिकाचे बाबा विनोद दुआ यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून डीलिट केली. त्यावर अक्षयला ठोकणार आहे, असा उल्लेख त्यांनी केला. आता याचाही शब्दशः अर्थ घ्यायचा का' असा उपरोधिक सवाल ट्विंकलने केला. मी विनोदाच्या बाबत कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपलं आहे, आता मी माझं मत व्यक्त केलं आहे, तर कृपया मला या विषयाशी संबंधित पोस्टमध्ये टॅग करु नका, असंही तिने ट्रोलर्सना झापलं.