Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  मालिकेत लवकरच एक ट्वीस्ट येणार आहे. मल्हार आणि मंजुळा लवकरच समोरासमोर येतील, असा अंदाज लावला जात आहे. सध्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मल्हार आणि मंजुळा स्वराजसाठी प्रार्थना करत आहेत. 

'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही मल्हारची वाट बघत आहेत. त्यानंतर मंजुळा ही पूजेचं साहित्य घेत असते. तेवढ्यात, मल्हार तिथे येतो. पण मल्हार हा मंजुळाला हे दोघेही एकमेकांना बघत नाहीत.मंजुळा ही पूजा करत असताना एक व्यक्ती मंजुळाला बघत असतो.  आता मल्हार आणि मंजुळा एकत्र येणार का? आई-बाबा एकत्र यावेत, ही स्वराजची इच्छा पूर्ण होणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

पाहा प्रोमो: 

उर्मिला कोठारेने तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. उर्मिलाने साकारलेली वैदेहीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पण वैदेहीचा मालिकेत मृत्यू झाल्यानं उर्मिला मालिकेत दिसणार नसल्याने तिचे चाहते नाराज झाले होते. आता  उर्मिलाने पुन्हा या मालिकेत एन्ट्री केली आहे. ती या मालिकेत मंजुळा ही भूमिका साकारत आहे.

सध्या 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील स्वराजला बोलता येत नाहीये. त्यामुळे मल्हारला त्याच्याबद्दल चिंता वाटत आहे. 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या मागील एपिसोडमध्ये  मल्हार हा स्वरा उर्फ स्वराजला एक माउथ ऑर्गन देताना दिसत आहे.

मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर ही साकारते. मंजुळा हे भूमिका देखील ऊर्मिला साकारते. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा आणि मल्हार येतील का समोरासमोर? 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल