Tharla Tar Mg: ठरलं तर मग मालिकेच्या भागात आता नवा ट्विस्ट आलाय. सायली आणि अर्जून सायली आणि अर्जुन यांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झालीये. त्यामुळे आता दोघांनाही त्यांच्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करायच्या आहेत.त्यातच सध्या त्यांच्यात सुरु असलेल्या प्रेमाचा खेळाचा गोड अनुभवही प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सायली अर्जूनसोबत गाण्यांचा गेम खेळत असते. तो तिनं गायलेल्या सगळ्या गाण्यांचा चुकीचा अर्थ सांगताना दिसतो. एकीकडे या दोघांना झालेली प्रेमाची जाणीव तर दुसरीकडे प्रतिमाला भूतकाळात आठवल्यानं प्रिया आणि नागराजनं प्रतिमाला खल्लास करायचा प्लॅन केल्याचं नुकत्याच दाखवलेल्या प्रोमोमधून समोर आलंय.


प्रतिमाला आठवला भुतकाळ


प्रतिमाला भुतकाळ आठवल्यानं आता आपलं बिंग फुटणार ही भीती प्रीया आणि नागराजला वाटते. आता प्रतिमाला संपवलंच पाहिजे या जाणिवेने दोघेही प्रतिमाच्या मारायचा प्लॅन बनवतात. तिच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिक्स करणार तोच सुमन प्रियाला हाक मारते. तेवढ्यात प्रिया लगबगीनं गोळी दुधात टाकते. हे दुध ती प्रतिमाला देण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. पण काहीच खायची प्यायची इच्छा नसल्यानं ती दुध प्यायला नकार देते. पण प्रिया तिला जबरदस्ती दुधाचा ग्लास द्यायला जाते तेंव्हा ती दुधाचा ग्लास ढकलते आणि दुध सांडतं. 


प्रतिमाला मारायचा डाव फसला


प्रियानं दुधात घातलेल्या गोळ्या पूर्ण विरघळलेल्या नसतात त्यामुळे रविराजला त्या दिसतात. त्यामुळे तो दुधात काय टाकलंय हे प्रियाला विचारतो. तेंव्हा दुधाच्या गोडीसाठी साखर फुटाणे घातल्याचं सांगून प्रिया थोडक्यात  बचावते. प्रतिमाला मारायचा प्लॅन फसल्यानं प्रिया आणि नागराज घाबरलेले दिसतात. असं या प्रोमोत दाखवण्यात आलं आहे. दुसरीकडे अर्जून आणि सायली आता एकमेकांना मनातल्या भावना सांगणार आहेत. याया प्रोमोही स्टार प्रवाहने समोर आणला आहे.


 






नवा प्रोमो समोर 


मालिकेचा नवा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सायली अर्जुन वाट पाहत चाफ्याची फुलं घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये बसलेली असते. तेव्हा अर्जुन तिच्यासाठी अंगठी घेऊन येतो. तेव्हा तो सायलीला मिसेस सायली अशी हाक मारतो आणि तिला म्हणतो की, मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर सायलीही अर्जुनला म्हणते की,मलाही तुम्हाला काय तरी सांगायचं आहे. त्यामुळे आता सायली आणि अर्जुनच्या मनातल्या या भावना ओठांवर कधी येणार याची उत्सुकता आहे. हा प्रोमो शेअर करत त्यावर अर्जुन-सायली एकमेकांसमोर व्यक्त करू शकतील का त्यांच्या मनातलं प्रेम...? असं कॅप्शन देण्यात आलं आहे.