Tharla Tar Mag : स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ठरलं तर मग (Tharla Tar Mag) मालिकेत सायली आणि अर्जुनच्या प्रेमाच्या नात्याला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. सायली आणि अर्जुन यांच्या नात्याची सुरुवातच त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून झाली होती. मधूभाऊंच्या केससाठी सायली अर्जुनसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार झाली होती. एका वर्षाने ते दोघे विभक्त होणार होते. पण या एका वर्षात सायली आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यामुळे ते दोघेही आता हे नातं निभावण्याचा निर्णय घेतात. पण त्यातच आता त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. 


अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी प्रिया अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होती. पण वेळोवेळी सायली आणि अर्जुन तिचा प्लॅन हाणून पाडायचे. त्यामुळे प्रियाच बऱ्याचदा तोंडावरही पडली. पण आता सायली अर्जुनचं हे सत्य समोर आणण्यात प्रियाचा हा डाव यशस्वी होणार असल्याचं दिसत आहे. 


नवा प्रोमो समोर


या नव्या प्रोमोमध्ये प्रतिमा सायली आणि अर्जुनला म्हणते की, खूप प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर...त्यावर सायली आणि अर्जुन हो आहे प्रेम असं म्हणतात.. तेव्हा कल्पना तिच्या लाडक्या लेकाच्या अर्जुनच्या थेट कानशिलातच लगावते. कल्पना म्हणते की, खोटं हे ही तुमच्या लग्नासारखंच खोटं... सायली त्यावेळी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करते पण त्यावर कल्पना तिला म्हणते की, तू थांब बाहेरच्या माणासाने यामध्ये पडू नये...हिचं सोड हि तर कधीच माझी नव्हती पण तू...तेव्हा अर्जुन म्हणतो की, काय बोलतेस तू काहीच कळत नाहीये...त्यावर कल्पना अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स त्यांच्यासमोर फेकते. हे पाहून सायली आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो. 


सायली-अर्जुन व्यक्त करणार एकमेकांवरचं प्रेम


सायली अर्जुन वाट पाहत चाफ्याची फुलं घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये बसलेली असते. तेव्हा अर्जुन तिच्यासाठी अंगठी घेऊन येतो. तेव्हा तो सायलीला मिसेस सायली अशी हाक मारतो आणि तिला म्हणतो की, मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर सायलीही अर्जुनला म्हणते की,मलाही तुम्हाला काय तरी सांगायचं आहे. त्यामुळे आता सायली आणि अर्जुनच्या मनातल्या या भावना ओठांवर कधी येणार याची उत्सुकता आहे. हा प्रोमो शेअर करत त्यावर अर्जुन-सायली एकमेकांसमोर व्यक्त करू शकतील का त्यांच्या मनातलं प्रेम...? असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 






ही बातमी वाचा : 


Tharla Tar Mag : ठरलं तर मग! सायली-अर्जुनच्या नात्यात प्रेमाचं 'कॉन्ट्रॅक्ट,' मनातल्या भावना आता तरी ओठांवर येणार?