Tharla Tar Mag : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका सध्या बरीच रंजक वळणावर आहे. अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आलंय. त्यामुळे सुभेदारांच्या घरातले आणि मधुभाऊ यांनी सायली आणि अर्जुनच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. पण असं असतानाच सायली आणि अर्जुनमध्ये जरी दुरावा आला असला तरीही त्यांचं नातं प्रेमाने बहरत असताना दिसतंय.
सत्य समोर आल्यामुळे जरी दुरावा आला असला तरीही अर्जुन आणि सायली त्यांचं नात वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न करतायत. त्यातच आता अर्जुन सायलीवरच्या त्याच्या प्रेमाची कबुली देणर आहे. त्यामुळे सायली आणि अर्जुनच्या नात्याची नवी सुरुवात होणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
नवा प्रोमो समोर
रविवार 29 डिसेंबर रोजी मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे. या महाएपिसोडमध्ये सायली शहर सोडून जाणार असते. तिला शोधण्यासाठी अर्जुन बस सँण्डवरही पोहचतो. पण सायली त्याला भेटत नाही. शेवटी माईकवरुन अर्जुन सायलीवरच्या प्रेमाची कबुली देतो. तो म्हणतो की, मिसेस सायली, आज मला अख्ख्या जगासमोर सांगायचं आहे, आय लव्ह यु मिसेस सायली, आय लव्ह यू...
सायली आणि अर्जुनचं नातं सध्या एका खडतर वळणावर आहे. मधुभाऊ देखील अर्जुनला त्यांची केस लढवण्यासही नकार दिला आहे. त्यासाठी त्यांनी अर्जुनचा कट्टर शत्रू जोशी वकिलांना त्यांची केस देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे सुभेदारांच्याही घरात कल्पना सायलीच्या कोणत्याही वस्तूही ठेवू देत नाही. असं असतानाच अर्जुन सायलीवरच्या त्याच्या प्रेमाची कबुली देतो. त्यामुळे आता सायली आणि अर्जुनच्या एका नव्या नात्याची सुरुवात होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.