Gautami Patil : दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिॲलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम 'आता होऊ दे धिंगाणा' (Ata Hou De Dhingana) लवकरच 100 भाग पूर्ण करणार आहे. याच निमित्ताने सबसे कातील गौतमी पाटीलची (Gautami Patil) एन्ट्री होणार आहे. तिच्यासोबतच धनंजय पोवार (Dhananjay Powar)आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Prabhu Walavalkar) सामील होणार आहे.
पहिल्या पर्वापासून आता होऊ दे धिंगाणाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधवचं खुमासदार सूत्रसंचालन आणि प्रवाह परिवाराचा सळसळता उत्साह हे या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने वेगळेपण. शंभराव्या या प्रवासात या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मनोरंजनाचा हा प्रवास असाच अखंड रहाणार आहे. शंभराव्या भागाच्या खास सेलिब्रेशनमध्ये प्रवाह परिवारासोबतच गौतमी पाटील, धनंजय पोवार आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर देखिल सामील होणार आहेत.
'आता होऊ द्या धिंगाणा'चं तिसरं पर्व
महाराष्ट्राला लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्जा झाला . या तिसऱ्या पर्वावरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करु लागलं. मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या या पर्वातही आहेत. त्याचसोबत गरागरा आणि भराभरा, डब्बा डब्बा उई उई, स्मायली काय गायली अश्या अतरंगी फेऱ्या देखील या पर्वात आहेत.