Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सहावा आठवडा सुरु आहे. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बिग बॉसच्या घरातील समीकरणं दिवसागणिक पाहायला मिळाली आहेत. सुरुवातीच्या आठवड्यात घरात टीम ए आणि टीम बी पडल्या. टीम एमध्ये नंतर फूटही पडली. आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरातील समीकरणं बदलताना दिसणार आहे. धनंजय पोवार उर्फ डीपी दादा टीम बीवर नाराज असल्याचं दिसत असून तो त्यांच्यापासून फारकत घेण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, अंकिता त्याची समजूत काढताना दिसत आहे.


डीपी दादा बी टीमवर नाराज


बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये धनंजय पोवार टीम बी वर नाराज असल्याचं दिसत आहे. टीम बीमध्ये आपली किंमत शून्य असल्याचं डीपी दादाला वाटत आहे. यामुळे डीपी दादा आता टीम बी सोडण्याच्या विचारात असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे टीम एमध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की-अरबाज विरुद्ध वैभव-जान्हवी असं समीकरण पाहायला मिळत असताना आता बी टीममध्येही फूट पडण्याची चिन्हं दिसत आहे.


टीम B सोडण्याच्या विचारात


डीपी दादा अंकिताला बोलतो की, अतिबोलण्याने किंमत शून्य झालोय, एवढंच आहे. ग्रुपमध्ये माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर मला कधी मिळालं नाही. यावर अंकिता विचारते, तुम्हाला असं सोडायचंय सगळ्यांना? त्यावर डीपी हो असं उत्तर देतो. दुसरीकडे, याबाबत चर्चा करताना पॅडी दादा म्हणतो की,  तुम्ही ग्रुपवर अविश्वास दाखवताय आणि काय चुकलंय? यावेळी अंकिता बोलते की, जे पण, त्यांना वाटतंय, ते चुकीचं आहे आणि यामुळे आता समीकरणं बदलणार आहेत.


डीपीची नाराजी, बदलणार का टीम B च्या खेळाचं समीकरण?






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : बिग बॉसला आलाय 'मदमस्त' निक्कीचा पुळका? थेट जान्हवीलाच आदेश देत म्हणाले...