Taarak Mehta Ka Ooltah Chashmah News : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 13 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील  कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. सध्या या मालिकेतील एका कलाकाराचा फोटो  सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे. या फोटोने अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील तारक मेहता ही भूमिका साकरणाऱ्या शैलेश लोढा यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. शैलेश यांनी सोशल मीडियावर त्यांच्या जुना फोटो शेअर केला होता. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो शेअर करून शैलेश यांनी त्याला कॅप्शन दिलं, ' मी स्वत:ला ओळख नाही.' अनेक नेटक ऱ्यांनी शैलेश यांच्या फोटोला लाइक केलं तसेच काहींनी कमेंट्स देखील केल्या आहेत. 






28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. शैलेश यांच्यासोबतच जेठालाल आणि पोपटलाल यांचे जूने फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


हे ही वाचा


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सोडणार जेठालाल? दिलीप जोशी म्हणाले...


Taarak Mehta ka Ooltah Chashmah show : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल पसरलेल्या 'या' अफवा माहितेय?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha