Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Producer Asit Modi : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने मालिकेचे निर्माते आणि ऑपरेशनल हेड यांच्या विरोधात मध्यरात्री पवई पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.


'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या एका अभिनेत्रीने असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेचे निर्माते असित मोदी आणि एग्जीक्यूटिव्ह निर्माते जतीन बजाज आणि त्यांचे साथीदार ऑपरेशनल हेड सोहेल रमानी यांच्याकडून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. 






गोरेगाव फिल्मसिटी आणि सिंगापूरमध्ये मालिकेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता अभिनेत्रीच्या तक्रारीची दखल घेत तीन जणांविरोधात कलम 354,509 चा अंतर्गत पवई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पवई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 


नेमकं प्रकरण काय? 


 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेचे निर्माते असित मोदी, प्रोजेक्ट हेड सोहिल रमानी आणि एग्झीक्युटिव्ह निर्माते जतिन बजाज यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. 


7 मार्चला अभिनेत्रीच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यावेळी तिने लवकर घरी जाण्यासाठी विचारले असता तिला अपमानित करण्यात आले. तसेच जबरदस्तीने सेटवर थांबण्यासाठी तिला धमक्या देण्यात आल्या. अभिनेत्रीने तीन महिन्यांपूर्वीच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडली आहे. 7 मार्च 2023 रोजी तिने शेवटचा एपिसोड शूट केला  आहे. 


संबंधित बातम्या


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता'च्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली,"सत्याचा विजय होतो"