मुंबई : विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या वादाचे रोज नवे अंक पाहायला मिळत आहेत. कपिल शर्माच्या मारहाणीनंतर सुनीलने कपिलच्या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त होतं. त्यातच सोनी टीव्हीनं कपिलसोबत 106 कोटींच्या कराराचं नूतनीकरण करण्यास नकार दिल्याचं वृत्त आलं. आता सुनील ग्रोव्हरनं आणखी एक ट्वीट करुन गोंधळ निर्माण केला आहे.


सुनीलनं या ट्वीटमधून आपण निराश असल्याचं म्हणलं आहे. त्यामुळे सुनीलच्या या नव्या ट्वीटमुळं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. सुनीलनं या ट्वीटमध्ये, ''सध्या मी थोडासा निराश आहे. भविष्यात काय होईल माहित नाही. पण परमेश्वराची कृपा आहे की, माझा मुलगा माझ्या सोबत आहे. जेव्हा मी त्याचा निरागस चेहरा पाहतो, तेव्हा मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कारण माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणण्यासाठी एक कारण आहे. हे कारणच मला भविष्यात काहीतरी चांगलं होईल, अशी प्रेरणा देतं.''


सुनीलच्या या ट्वीटमुळं सध्या अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. कारण सुनीलनं या पूर्वीच ट्वीट करुन आपण दुसऱ्या टीव्ही शोमध्ये काम करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यातच या नव्या ट्विटचा अनेकजण वेगवेगळे अर्थ काढत आहेत.

सुनील ग्रोव्हरनं काही दिवसांपूर्वी ट्वीट करुन आपण नवा शो घेऊन येत असल्याचं सांगितलं होतं. शिवाय त्याच्या सोबत या नव्या शोमध्ये अभिनेता किकू शारदा असल्याचंही त्यानं सांगितलं होतं. त्यातच सुनीलच्या या नव्या ट्वीटमुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे.

तर दुसरीकडे, कपिल शर्माच्याही अडचणीत दिवसागणिक भरच पडत आहे. कपिल शर्मासोबतच्या 106 कोटींच्या कराराचं नूतनीकरण करण्यास नकार दिला आहे. त्यातच विमानात केलेल्या राड्यामुळे विमान कंपन्यांकडूनही व्हीव्हीआयपी प्रवासी आणि सेलिब्रिटींविरोधात एअर इंडियाने कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार, एअर इंडिया कॉमेडियन आणि टीव्ही स्टार कपिल शर्माला समज देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सध्या कपिलमागे संकटांचे शुक्लकाष्ट सुरु आहे.

संबंधित बातम्या

एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत

...म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?

‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?

कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर

कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?

सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट

…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं