Siddarth Jadhav Video Viral : 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या कार्यक्रमातील एका भागाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) 'अप्सरा आली' गाण्यावर कविता ऐकवताना दिसत आहे.
'खुप्ते तिथे गुप्ते' या बहुचर्चित कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची चाहत्यांना उत्सुकता आहे. नवीन पर्वाची चर्चा सुरू असतानाच या कार्यक्रमातील काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमाच्या एका भागात सिद्धार्थ जाधव आणि संजय नार्वेकर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी सिद्धार्थने 'अप्सरा आली' या सुपरहिट गाण्यावर केलेली एक कविता ऐकवली होती.
सिद्धार्थने 'अप्सरा आली' गाण्यावर काय कविता केली होती?
कोमल बारमध्ये झपकन शिरलो, ऑर्डर दिली वेटरला…
वेटर आला, गालात हसला, कॉटर दिली त्याने मला…
ही कॉटर नकली, इंग्लिश असली, आणायला सांगितली…
मी चार चार बाटल्या झपझप घेतली, चक्कर मला आली…
झपकन आली…
सिद्धार्थचा 'अप्सरा आली' या गाण्यावरील कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थने ही कविता केली होती. या कवितांबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला होता,"शूटिंगदरम्यान मी आणि संजय जाधव आम्ही टाइमपास म्हणून अशा कविता करायचो".
सिद्धार्थची कविता ऐकल्यानंतर खुपते तिथे गुपतेवर कविता केली नाही का? असं अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) त्याला विचारतो. यावर उत्तर देत सिद्धार्थ म्हणतो, “अजून मला सुचलं नाही. मला आधी चाल सुचते. मग कविता सुचते.” पुढे अवधूत गुप्ते त्याला “जितेंद्र जोशीसाठी तू स्पर्धस आहेस,” असं म्हणतो. “जितेंद्र माझा पुतळा लावून कविता लिहितो. तो एकलव्य आहे आणि मी त्याच्यासाठी द्रोणाचार्य आहे. त्याच्याकडे माझा फोटो आहे. जितेंद्र मस्ती करतोय,” असं मजेशीर उत्तर सिद्धार्थ अवधुत गुप्तेला देतो.
संबंधित बातम्या