Yashoman Apte On Shubhvivah : अभिनेता यशोमन आपटे (Yashoman Apte) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. याआधी रोमॅंटिक हिरोच्या भूमिकेत यशोमन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता 'शुभविवाह' (Shubhvivah) या मालिकेत तो मानसिक स्थैर्य गमावलेल्या आकाशच्या भूमिकेत दिसणार आहे. 


आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि आव्हानात्मक पात्र यशोमन 'शुभविवाह' या नव्या मालिकेमध्ये साकारणार आहे. ही नवी मालिका 16 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका प्रेक्षक 16 जानेवारीपासून दुपारी दोन वाजता स्टार प्रवाहवर पाहू शकतात. 






आकाशच्या भूमिकेविषयी यशोमन म्हणाला,"आजवर मालिकांमध्ये मी रोमॅंटिक हिरोच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आलो आहे. पण आता 'शुभविवाह' या मालिकेतील ही भूमिका खऱ्या अर्थाने इमेज ब्रेक करणारी ठरेल. ही भूमिका म्हणजे माझ्यासाठी वर्कशॉप आहे. आकाशने मानसिक स्थैर्य गमावलं आहे. त्यामुळे वयाने मोठा असला तरी तो लहान मुलासारखा वागतो. आकाशच्या अशा वागण्यामागे एक कारण दडलेलं आहे. हे कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ही मालिका पाहावी लागेल. ". 


यशोमन पुढे म्हणाला,"आकाश साकारताना नवनव्या गोष्टी आत्मसात करत आहे. म्हटलं तर ही भूमिका साकरण्यासाठी बंधन आहेत आणि म्हटलं तर नाही. आकाश कोणत्या गोष्टीवर कशा पद्धतीने व्यक्त होईल हे समजून घेऊन सीन करावा लागत आहे. प्रत्येत सीननंतर या पात्रावरची पकड घट्ट होत आहे. आजवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं आहे. त्यांचं हे प्रेम आता नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे. 


शुभविवाह
कुठे पाहू शकता? स्टार प्रवाह
किती वाजता? दुपारी दोन
कधीपासून? 16 जानेवारी


संबंधित बातम्या


Amruta Deshmukh : अमृता देशमुखचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास संपला; पुण्याची टॉकरवडी पोस्ट शेअर करत म्हणाली,"ऑल इज नॉट वेल"