Amruta Deshmukh : 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi 4) हा छोट्या पडद्यावरील चर्चेत असणारा कार्यक्रम आहे. पण आता या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. विकास सावंतनंतर लगेचच पुण्याची टॉकरवडी अर्थात अमृता देशमुखचा (Amruta Deshmukh) बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. 


गेल्या काही दिवसांत अमृताने बिग बॉसच्या घरात स्वत:ला सिद्ध केलं होतं. टास्कदेखील ती उत्तम खेळत होती. पण तरीदेखील 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांनी पहिल्या नॉमिनेशन टास्कपासून तिला नॉमिनेट केलं होतं. टास्कदरम्यान आक्रमक झाल्याने, तसेच चांगली खेळत असल्याने चाहत्यांनी तिला यातून बाहेर काढले. 


अमृता देशमुखची खास पोस्ट (Amruta Deshmukh Post) : 


'बिग बॉस'च्या घरातून आऊट झाल्यानंतर अमृताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"बिग बॉस मराठीच्या या टप्प्यावर बाहेर पडले आहे. या दु:खातून मी अद्याप बाहेर पडले नाही. थोडक्यात ऑल इज नॉट वेल... काय चूक काय बरोबर...कोण फेअर, कोण अनफेअर हे तपासणे तेव्हाही सुरू होतं आणि आत्ताही सुरू आहे". 






अमृताने पुढे लिहिलं आहे,"पण तुमच्या प्रेमामुळे आतमध्ये असताना मला ऊर्जा मिळत होती आणि त्याच गोष्टीमुळे आतासुद्धा मिळत आहे. आता कमेंट करत सकारात्मका दिलीत तर सगळं ऑल इज वेल वाटेल...आभार". अमृताच्या या पोस्टवर तू 'टॉप 5' मध्ये असायला हवं होतसं, चांगली खेळलीस, बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची विजेती अमृता देशमुखचं अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


अमृता देशमुखने छोटा पडदा गाजवला आहे. 'फ्रेशर्स' या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली. सध्या ती आर.जे चं काम करत आहे. पुण्याची टॉकरवडी म्हणून ती लोकप्रिय आहे. बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी सध्या स्पर्धक नव-नवे डावपेच आखत आहेत. 


संबंधित बातम्या


Snehlata Vasaikar : 'बिग बॉस मराठी'च्या घरातून स्नेहलता वसईकर आऊट; पोस्ट शेअर करत म्हणाली,"Bigg Boss'चा प्रवास इथेच संपला असला तरी..."