Shiv Thakare On Casting Couch: 'बिग बॉस-16' (Bigg Boss 16) या शोमुळे शिव ठाकरेला (Shiv Thakare) विशेष लोकप्रियता मिळाली. शिव हा बिग बॉस-16 चा रनरअप ठरला. शिव हा अमरावतीचा आहे. अमरावतीमधून मुंबईला येऊन शिवनं मनोरंजनक्षेत्रात विशेष लोकप्रिया मिळवली. पण शिवनं करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल केला. शिवला कास्टिंग काऊचचा देखील सामना करावा लागला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शिवनं कास्टिंग काऊचचा किस्सा सांगितला.
शिवनं सांगितला कास्टिंग काऊचचा किस्सा
एका मुलाखतीमध्ये शिवनं कास्टिंग काऊचचा किस्सा सांगितला तो म्हणाला, 'एकदा मी आराम नगर येथे ऑडिशनसाठी गेलो होतो. त्यावेळी मला एक व्यक्ती बाथरुममध्ये घेऊन गेला. तो म्हणाला, इथे एक मसाज सेंटर आहे. मला मसाज सेंटर आणि ऑडिशनमधील कनेक्शन कळालं नाही. त्या व्यक्तीनं पुढे मला विचारले, तू वर्क आऊट करतो का? ऑडिशननंतर इथे एकदा ये. त्याचं हे बोलणं ऐकून मी तिथून निघून गेलो. तो कास्टिंग डिरेक्टर होता. त्यामुळे मला त्याच्यासोबत पंगा घ्यायचा नव्हता.' पुढे शिवनं सांगितलं की, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कास्टिंग काऊच हे केवळ मुलींसोबतच नाही तर मुलांसोबत देखील होते.
शिवला आणखी एकदा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. दुसऱ्यांदा झालेल्या कास्टिंग काऊचबद्दल शिव म्हणाला, 'चार बंगला येथे एक मॅडम होत्या. 'मैने इसको बनाया है, मैने उसको बनाया है' असे त्या मला सांगत होत्या. रात्री 11 वाजता त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावले. रात्री कोणत्या ऑडिशन घेतल्या जातात हे मला काळालं होतं. मी त्यांना सांगितले की, मला दुसरं काम आहे त्यामुळे मी भेटू शकत नाही. यावर त्या म्हणाल्या, 'तुला काम नकोय का? तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही.'
शिवनं त्याची स्ट्रगल स्टोरी देखील सांगितली होती. तो म्हणाला, 'मी अमरावतीला राहायचो, त्यामुळे जेव्हा कधी मला ऑडिशनसाठी फोन यायचा तेव्हा मी त्यांना खोटं सांगायचो की मी मुंबईत आहे. मी रात्री आठ वाजता ट्रेन पकडायची. मला कधीच रिझर्व्हेशन मिळत नव्हते रिझर्व्हेशनसाठी माझ्याकडे पैसे नव्हते.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :