Maharashtrachi Hasyajatra:    'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या  छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला  प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पण आता एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या कार्यक्रमावर टीका केली आहे. या नेटकऱ्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधील कलाकार पृथ्वीक प्रतापनं (Prithvik Pratap) सडेतोड उत्तर दिलं आहे. 


पृथ्वीक प्रतापनं सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. एका नेटकऱ्यानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाबाबत एक कमेंट केली होती. तो म्हणाला होता की,   ''महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता फॅमिली शो राहिला नाही. कुटुंबाबरोबर बसून हा कार्यक्रम मी बघत असेल आणि तुमच्या एखाद्या जोकवर हसलो तर तिथेच विषय संपतो.' यावर पृथ्वीकनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.


पृथ्वीकचा रिप्लाय


पृथ्वीकनं त्या नेटकऱ्याला रिप्लाय दिला,  'Incognito मोडमध्ये जाऊन पॉर्न बघणाऱ्यांनी फॅमिली शो पाहायचा अशी पिपाणी वाजवू नये. दिवसाला आई-बहिणींवरुन शंभर शिव्या घालणाऱ्यांना सुद्धा एखादा डबल मीनिंग पंच आला की, त्रास होतो. वाह रे दुनिया.'




'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमासोबतच  पृथ्वीकनं  पोस्ट ऑफिस उघड आहे (Post Office Ughad Aahe) या मालिकेत देखील काम केलं. पृथ्वीक हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. पृथ्वीकच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. पृथ्वीक हा इन्स्टाग्रामवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. त्याला इन्स्टाग्रामवर  72.6K  फॉलोवर्स आहेत. पृथ्वीक हा इन्स्टाग्रामवर त्याच्या विविध लूकमधील फोटो देखील शेअर करत असतो. 






 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला मिळाली प्रेक्षकांची पसंती 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी  करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtrachi Hasyajatra: समीर चौघुलेनं अश्विनी भावेंना दिली 'लिंबू कलर' ची भेटवस्तू; गिफ्ट पाहून खळखळून हसाल