Shetkarich Navra Hava : 'शेतकरीच नवरा हवा' (Shetkarich Navra Hava) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ही मालिका रोमॅंटिक वळणावर आली आहे. या मालिकेत आता सया आणि रेवाच्या लग्नाचा बार उडणार आहे.


रेवा आणि सयाजीची प्रेमकथा 'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सयाजीच्या भूमिकेत अभिनेता प्रदीप घुले दिसणार आहे. तर ऋचा गायकवाड रेवाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रदीप आणि ऋचा शेतीशी परिचित असल्यामुळे त्यांना या क्षेत्राचा चांगलाच अनुभव आहे. 






ऋचा मुळची कोकणातली असल्याने तिच्या घरी शेती केली जाते व प्रदीप साताऱ्याचा असल्याने त्याच्याही गावाकडे शेती केली जात आहे. कोरोनाकाळातदेखील त्याने शेतीची अनेक कामे केली आहेत. शेवतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले तर त्यांचे आयुष्य समृद्ध होऊ शकते, शेतकरी आपला अन्नदाता आहे, तो सुखी राहिला तर आपण सुखी होऊ शकतो, हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. 


'शेतकरीच नवरा हवा' मालिकेचा रंगणार एक तासाचा विशेष भाग!


'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेचा आता एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. या विशेष भागात प्रेक्षकांना सया आणि रेवाचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 14 मे 2023 रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांना सया आणि रेवाचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. 


मराठी मालिका आजही आवडीने पाहणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मालिकांच्या माध्यमातून कलाकार घराघरांत पोहोचतात. आजही अनेक मालिका प्रेक्षक पुन्हा पुन्हा पाहताना दिसतात. पण मागच्या काही वर्षांपासून मालिका आणि त्यांच्या कथांचा ट्रेंड बदलू लागला आहे. दर दोन मालिकांनंतर तिसऱ्या मालिकेची कथा सारखी वाटू लागते. बऱ्याच ठिकाणी तिच रडारड तोच ड्रामा. असं असलं तरी प्रेक्षक मात्र मालिका पाहणं सोडत नाही. अशातच आता रडक्या मालिकांना वैतागलेल्या प्रेक्षकांसाठी नव्या विषयाची नवी कोरी मालिका 'शेतकरीच नवरा हवा' प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मराठी मालिकेतून पहिल्यांदाच शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात येत आहे. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 13 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!