Shark Tank India: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना घेऊन शार्क टँक इंडिया या शोमध्ये येतात. त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनचा प्रोमो काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये शार्क टँक इंडिया- 2 (Shark Tank India-2) च्या रिलीज डेटबाबत माहिती देण्यात आली नव्हती. आता या कार्यक्रमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.
सोनी लिव आणि शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शार्क टँक इंडिया- 2 या कार्यक्रमाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आलेली आहे. हा प्रोमो शेअर करुन कार्यक्रमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. 2 जानेवारी 2023 पासून रात्री 10 वाजता शार्क टँक इंडिया-2 हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम सोनी लिवच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील स्ट्रीम केला जाणार आहे.
पाहा प्रोमो:
हे असणार परीक्षक
शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सीझनमध्ये देखील ‘शादी डॉट कॉम’ची सह-संस्थापक अनुपम मित्तल, ‘बोट’ कंपनीचे को सह-संस्थापक अमन गुप्ता, ‘लेंस्कार्ट’ कंपनीचे संस्थापक पीयुष बंसल, 'शुगर कॉस्मेटिक्स' कंपनीच्या सह-संस्थापक विनीता सिंह आणि 'एमक्योर फार्मास्युटिकल्स'च्या कार्यकारी संचालक नमिता थापरही हे परीक्षकाची भूमिका साकारणार आहेत. तर कार देखो ग्रुपचे सह-संस्थापक आणि सीईओ अमित जैन यांची दुसऱ्या सीझनमध्ये एन्ट्री होणार आहे.
शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाच्या पाहिल्या सीझनमुळे चर्चेत असलेले अश्नीर ग्रोवर आणि ममाअर्थ कंपनीच्या सहसंस्थापक गझल अलग हे दोन शर्क्स दुसऱ्या सीझनमध्ये परीक्षक म्हणून सहभागी होणार नाहीत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: