मुंबई : ज्योतीर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद (Shankaracharya Avimukteshwaranand) महाराज यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे ते चर्चेत राहिले आहेत. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर काही खळबळजनक आरोपही करण्यात आले होते. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितलं आहे. यासोबतच शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभेतील खासदार अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिच्यावर भडकले आहेत. कंगना राणौतबद्दलचं त्यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 


शंकराचार्यांचे कंगनावर गंभीर आरोप


शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर ते पुन्हा चर्चेत आले. आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांच्या एका वक्तव्यात कंगना राणौतवर गंभीर आरोप केले आहेत. शंकराचार्य यांनी म्हटलं आहे की कंगना राणौतच्या चेहऱ्याकडे पाहणंही त्यांच्यासाठी पाप आहे. कंगना राणौतने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप शंकराचार्य यांनी केला आहे. 


गोमांस खाण्याचा कंगनावर आरोप


कंगना राणौतवरील गोमांस खाण्याच्या आरोपावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी 'एएए मीडिया'ला सांगितलं की, 'तिच्यावर कोणीही आरोप केलेला नाही, तिनं स्वतः हे मान्य केलं होतं. ही गोष्ट जगजाहीर आहे. याबाबत आतापर्यंत कंगनाने कोणतीही खंत व्यक्त केलेली नाही आणि पश्चात्ताप केलेला नाही, असं शं‍कराचार्यांनी म्हटलंय. 


'कंगनाचा चेहरा पाहिल्यावर पाप लागेल'


खासदार होण्यापूर्वी सुमारे 5 वर्षांआधी कंगनाने वक्तव्य करुन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या, त्यावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मौन सोडलं आहे. कंगना राणौतबाबत विचारल्यावर शंकराचार्य म्हणाले की, "आम्हाला अशा व्यक्तीचा चेहरा बघायचा नाही, आम्हाला पाप लागेल. अशा व्यक्तीचं नावही घ्यायला आम्हाला आवडणार नाही." असंही त्यांनी म्हटलं आहे.


कंगनाकडून गोमांस खाण्याचं समर्थन?


कंगना रणौतने 2019 मध्ये तिच्या एका ट्विटमध्ये गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं, त्यानंतर अभिनेत्रीच्या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता. कंगनावर गाईचे मांस खाल्ल्याचा आरोपही होऊ लागला होता. कंगना रणौतने 24 मे 2019 केलेल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, "गोमांस किंवा इतर कोणतंही मांस खाण्यात काहीही गैर नाही. हे धर्माबद्दल नाही. कंगना राणौतने आठ वर्षांपूर्वी शाकाहारी बनून योगी बनण्याचा निर्णय घेतला, हे गुपित नाही. आजही ती फक्त एका धर्मावर विश्वास ठेवत नाही, तिचा भाऊ मीट खातो."


कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, ही याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळली होती. कंगना रणौत याआधीही तिच्या वक्तव्यांमुळे अनेक वेळा वादात सापडली आहे. सध्या कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभेतून खासदार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : "ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, ती हसत सांगतेय", वर्षा ताईंना त्रास देण्याचा जान्हवीचा प्लॅन; नेटकरी चांगलेच संतापले