मुंबई : मुंबई-पुण्यात लागलेल्या 'दादा, मी प्रेग्नंट आहे' या होर्डिंगबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले होते. मात्र आता या होर्डिंगचं गुपित अखेर उलगडलं आहे. 'दादा, मी प्रेग्नंट आहे', हे होर्डिंग एका नाटकाच्या प्रमोशनचं आहे. यामधील आणखी एक धक्कादाखक बाब म्हणजे या होर्डिंगचा संबंध अभिनेत्री प्रिया बापटच्या 'गुड न्यूज'शी आहे.




प्रिया बापट नाट्यरसिकांसाठी "दादा, एक गुड न्यूज आहे" हे नवंकोरं नाटक घेऊन येत आहे. या नाटकाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या नाटकात उमेश कामत आणि हृता दुर्गुळे हे जोडी भाऊ-बहिण म्हणून दिसणार आहे.

'दादा मी प्रेग्नंट आहे', मुंबईसह पुण्यात होर्डिंगची चर्चा

उमेश या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत आहे. तर हृता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे.



काही दिवसांपासून दादरच्या प्रभादेवी आणि पुण्यातील कर्वे रोडच्या डेक्कन टी पॉईंट इथे 'दादा, मी प्रेग्नंट आहे', हे होर्डिंग पाहायला मिळत आहे. या होर्डिंगमागचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यातच प्रिया बापटने चार दिवसांपूर्वी 'एक गुड न्यूज आहे,' अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्यामुळे प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची चर्चा रंगू लागली.

'कुणीतरी येणार गं', प्रिया-उमेशच्या घरी लवकरच नवा पाहुणा!

मात्र आता या होर्डिंगचा आणि प्रिया बापटच्या पोस्टचा संबंध असल्याचं समोर आलं आहे. 'दादा, मी प्रेग्नंट आहे' हे होर्डिंग प्रिया बापटच्या 'दादा, एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या प्रमोशनसाठी लावलं आहे.


परंतु प्रिया बापटच्या 'एक गुड न्यूज आहे' पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचा काहीसा भ्रमनिरास झाला आहे.