Zee Talkies Comedy Awards : 'झुकेगा नही साला' म्हणत साऊथच्या 'पुष्पराज'ने चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमातील समंथाचं 'ऊ अंटवा मावा ऊ ऊ अंटवा मावा' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. आता या गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री मराठीतील चार ज्येष्ठ अभिनेत्यांसोबत डान्स करणार आहे. 'झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड'मध्ये (Zee Talkies Comedy Awards) प्रेक्षकांना हा डान्स पाहायला मिळणार आहे. 


झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डचा मंच होणार हॉट


आजच्या तरूणाईला लाजवत चार ज्येष्ठ अभिनेते 'झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड'च्या स्टेजवर एमी एला बरोबर डान्स करणार आहेत. सुनील तावडे, विजय कदम, विजय पाटकर आणि जयवंत वाडकर या कलाकारांचा यात सहभाग आहे. हे चौघेजण स्टेजवर 'यही उमर है कर ले गलती से मिस्टेक' म्हणत ठेका धरणार आहेत. 






मराठीतील विनोदी नाटक आणि सिनेमांसाठी पुरस्कारांची बरसात करणाऱ्या झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळ्याचा काउंटडाउन सुरू झाला आहे. येत्या 9 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता हा सोहळा रंगणार आहे. 


विनोदी सिनेमा, नाटक, कलाकार यांना सन्मानित करण्याबरोबच झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या मंचावर मनोरंजनाची मुसळधार बरसात होणार आहे. विनोदवीर दादा कोंडके यांच्या सिनेमातील हसून लोटपोट करणारे संवाद, ठसकेबाज गाणी यांची पर्वणी तर आहेच पण ज्येष्ठ अभिनेत्यांची सेकंड इनिंगही आयटम साँगवर थिरकण्यासाठी सज्ज झाली आहे.


संबंधित बातम्या


Ameya Khopkar : 'आदिपुरुष'ला भाजपचा विरोध, मात्र मनसेचा पाठिंबा; 95 सेकंदांच्या टीझरवरुन मूल्यमापन करू नका, अमेय खोपकरांचा सल्ला


Rakhi Sawant : ‘मला मुख्यमंत्री करा’ राखी सावंतची अजब मागणी, सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत!