Rakhi Sawant : ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. आपल्या हटके वक्तव्यांमुळे ती नेहमी चर्चेत असते. लोकांचे मनोरंजन करण्यात आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात राखी कधीही कसर सोडत नाही. ती अनेकदा तिच्या विचित्र वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता इंटरनेटवर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राखी सावंत मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखीने पुन्हा एकदा हटके वक्तव्य केली आहेत. तिने तिच्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांचा उल्लेख केला आहे.


राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. तसेच, राखी सावंतने राजकारणात आल्यानंतर तिला कोणते पद हवे आहे, हे देखील सांगितले.


मला मुख्यमंत्री बनवा...


व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये राखी सावंत आपल्याला मुख्यमंत्री बनवल्यास काय काय करू, याविषयी सांगितले आहे. ती या व्हिडीओमध्ये म्हणतेय, ‘मला या देशाचं मुख्यमंत्री बनवलं, तर ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या गोऱ्या गालांसारखे आणि त्यांच्या कंबरे सारखे रस्ते बनवीन. आपल्या ड्रीमगर्लसारखे सुंदर रस्ते मी बनवेन. तसे, आपल्या भारतात प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहेत. तुम्ही याकडे गंमतीत पाहू नका. मोदीजी चहा बनवता बनवता पीएम झाले, तर मी बसल्या बसल्या आणि हसता हसवता सीएम का होऊ शकत नाही?’, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या.



हेमा मालिनी यांनीही घेतले होते राखीचे नाव


यापूर्वी हेमा मालिनी यांनी देखील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्या राखी सावंतच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल बोलल्या होत्या. हेमा मालिनी यांच्या या व्हिडीओवर राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली की, ‘आज मी खूप आनंदी आहे, हे गुपित होते की यावेळी मी 2022मध्ये निवडणूक लढवणार आहे. बरं, पंतप्रधान मोदीजी आणि आमचे अमित शाहजी यांची घोषणा करणार होते… पण मी भाग्यवान आहे की माझ्या आवडत्या अभिनेत्री ड्रीमगर्ल हेमा मालिनीजी यांनी यावेळेस मी निवडणुकीत उभी आहे, अशी घोषणा केली आहे.


संबंधित बातम्या :



Rakhi Sawant Home Tour Video : राखी सावंतचा आलिशान महाल! ‘ड्रामा क्वीन’चं दुबई स्थित घर पाहिलंत का?