मुंबई : प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली 'स्टार वन' वाहिनीवरील मालिका 'साराभाई व्हर्सेस साराभाई' पुनरागमन करत आहे. वेब सीरिजच्या माध्यमातून साराभाई कुटुंब तब्बल 11 वर्षांनी भेटीला येत असून शूटिंगला पुन्हा सुरुवात झाली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून निर्मात्यांनी सिरीयलच्या सेटची सफर घडवली.


निर्माते आणि अभिनेते जेडी मजेठिया यांनी फेसबुक लाईव्ह करत साराभाई कुटुंबातील विविधांगी व्यक्तिरेखा आणि त्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांची पुन्हा ओळख करुन दिली. येत्या मे महिन्यात 'साराभाई व्हर्सेस साराभाई'चा दुसरा सिझन वेब सीरिजच्या माध्यमातून सुरु होणार आहे.

रत्ना पाठक शाह (माया साराभाई), सतीश शाह (इंद्रवर्धन साराभाई), रुपाली गांगुली (मोनिषा साराभाई), सुमीत राघवन (साहिल साराभाई), राजेश कुमार (रोसेश साराभाई) यांच्यासोबत नवीन बालकलाकारही यात दिसणार आहे. हा चिमुरडा साहिल आणि मोनिषाचा मुलगा असण्याची शक्यता आहे.

फेसबुक लाईव्हमध्ये रोसेशची कविता :

आया आया साराभाई फॅमिली, फिरसे मचाने धूम
सबकी धडकने करेगी धूम धूम फट्ट फट्ट ठूम
पुराने नमुनो के साथ नये भी होंगे सिर्फ हॉटस्टार पर
टुगेदर दे विल फिल द हाऊस
और हाऊस दिखेगा क्युट क्युट, गोलु गोलु जैसे मॉमा का ब्रोकेड ब्लाऊज

फेसबुक लाईव्ह