Bigg Boss 16 Winner : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. या पर्वाच्या ग्रॅंड फिनालेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'बिग बॉस 16'च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


'बिग बॉस 16'च्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल


'बिग बॉस'च्या या अतरंगी पर्वाचा विजेता शिव, अर्चना, प्रियांका, एमसी स्टॅन नसून 'बिग बॉस' स्वत: आहे. हे पर्व यशस्वी होण्यामागे बिग बॉसचा मोलाचा वाटा आहे. बिग बॉस स्वत: खेळणार यंदाचं पर्व असं म्हणत या पर्वाची घोषणा करण्यात आली होती. पण खेळ जसा पुढे गेला तसा या वाक्याचा अर्थ प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने कळला. स्पर्धकांमधील भांडण, वाद, टास्क आणि बिग बॉसची हटके खेळी या सर्व गोष्टींमुळे यंदाचं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. टीआरपीच्या शर्यतीतदेखील 'बिग बॉस 16'ने बाजी मारली आहे.


पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'चा दबदबा


'बिग बॉस' हिंदीचे 15 सीझन आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले असले तरी 16 वं पर्व मात्र वेगळं ठरलं आहे. 16 वं वरीस धोक्याचं असल्याप्रमाणे 'बिग बॉस'चं 16 वं पर्वदेखील स्पर्धकांसाठी धोक्याचं ठरू शकतं. 'बिग बॉस' घरातील प्रत्येक कामात तसेच सदस्यांना गरज असेल तेव्हा त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे एक चांगला खेळाडू म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे खेळ कसा बदलणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 


'बिग बॉस 16'मध्ये 'मंडली'ची चर्चा


'बिग बॉस 16'मध्ये 'मंडली'ने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. सिने-निर्माता साजिद खानने मंडलीची निर्मिती केली होती. आता या मंडलीतील सहा सदस्यांपैकी शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोनच स्पर्धक 'टॉप 5'मध्ये पोहोचले आहेत. तर दुसरीकडे शालिन, प्रियांका आणि अर्चनाने आपल्या उत्तम खेळीने बिग बॉसच्या घरात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आता या पर्वाची ट्रॉफी कोणाला मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. 






'बिग बॉस 16'चा ग्रॅंड फिनाले उद्या (12 फेब्रुवारी) होणार आहे. कलर्स वाहिनीवर रात्री 9 वाजता हा ग्रॅंड फिनाले प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 16 Finale : प्रियांका चौधरी ते शिव ठाकरे; 'Top 5' स्पर्धकांमध्ये मोठी चुरस