मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने इतिहास घडवला होता. परशा-आर्चीची जोडी लोकांना इतकी आवडली की सिनेमाने तब्बल 90 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला. या चित्रपटातली गाणी, यातले कलाकार लोकांना खूप आवडले. पण त्यापलिकडे जाऊन मंजुळे यांनी ऑनर किलिंगची समस्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सिनेमाच्या यशानंतर मंजुळे यांनी मेकिंग ऑफ सैराट ही मालिका आणली. तीदेखील लोकप्रिय झाली. आता हा विषय छोट्या पडद्यावर अवतरणार आहे.
हिंदी टीव्हीसृष्टीतील आघाडीची वाहिनी अँड टीव्हीवर 'जात न पुछो प्रेम की' ही नवी मालिका येत आहे. ही मालिका ऑनर किलिंगवर बेतलेली असून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत किन्शुक वैद्य आणि प्रणाली राठोड ही जोडी झळकणार आहे.
'जात न पुछो प्रेम की' या मालिकेची कथा उत्तर प्रदेशात घडते. पण ती बेतली आहे सैराटशी संबंधित विषयावरच. याबद्दल बोलताना वाहिनीचे अधिकारी विष्णू शंकर म्हणाले, आम्ही अशा विषयावरची मालिका आणतो आहोत. सैराटचा विषय आम्हाला खूप आवडला. अत्यंत महत्वाचा विषय या सिनेमातून मांडला होता. मग असाच विषय टीव्हीवर का येऊ नये असा विचार करून आम्ही ही मालिका आणतो आहोत. लवकरच ती प्रेक्षकांना पाहता येईल.
विशेष बातमी अशी की या मालिकेचा टायटल ट्र्रॅक अजय-अतुल यांनी दिल्याची बातमी आहे. याबद्दल त्या दोघांशी संपर्क होऊ शकलेला नाही. पण त्यांनी या मालिकेला संगीत देणे ही मराठी मनाला निश्चित समाधान देणारी बाब मानावी लागेल.
Sairat : हिंदी मालिकेच्या रुपात येणार सैराट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 May 2019 09:07 PM (IST)
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने इतिहास घडवला होता. परशा-आर्चीची जोडी लोकांना इतकी आवडली की सिनेमाने तब्बल 90 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला. आता याच सैराटची कथा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -