Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4'च्या (Bigg Boss Marathi 4) या आठवड्यात अपूर्वा, प्रसाद, रोहित आणि अमृता देशमुख हे चार सदस्य नॉमिनेटेड होते. त्यांच्यापैकी रोहित शिंदेला (Rohit Shinde) घराबाहेर पडावे लागले आहे. रोहित घराबाहेर पडताना स्पर्धक भावूक झाले होते. 

Continues below advertisement


'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या पर्वातली चर्चेत असणारी जोडी म्हणजेच रुचिरा जाधव आणि तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदे. गेल्या काही दिवसांपूर्वी रुचिरा घराबाहेर पडली होती. आता तिच्यापाठोपाठ रोहितदेखील घराबाहेर पडला आहे. रुचिरा घराबाहेर पडल्यानंतर रोहितचं काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता महिन्याभरातच रोहितदेखील घराबाहेर पडला आहे. 


रोहित शिंदे कोण आहे?


रोहित हा अभिनेता नसून एक उत्तम मॉडेल आहे. पेशाने डॉक्टर असला तरी त्याला मॉडेलिंगची प्रचंड आवड आहे. ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी त्याने मॉडेलिंग केलं आहे. फिटनेसकडेही तो लक्ष देतो. काही ब्रॅंडसाठी त्याने रॅम्मवॉकही केलं आहे. 






वाईल्ड कार्ड सदस्यांची एक्झिट 


बिग बॉस मराठीच्या घरात चार चॅलेंजर्सची एन्ट्री झाली होती. त्यांच्या येण्याने घरातील सदस्यांची नाती बदलताना दिसली. नव्या सदस्यांच्या घरात येण्याने खेळ बदलताना दिसत होता. पण नुकत्याच पार पडलेल्या बिग बॉसच्या चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी घरातील सदस्यांना मोठा धक्का दिला. त्यांनी विशाल आणि मीरा यांना घरातून बाहेर येण्यास सांगितले.


बिग बॉसचा प्रवास संपल्यानंतर रोहितने एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने म्हटलं आहे,"माझ्या संपूर्ण #rohitarmy ला पण खूप खूप धन्यवाद... असच प्रेम करत राहा". त्याच्या व्हिडीओवर तूच आमच्यासाठी विजेता होतास, अशा कमेंट्स चाहते करत आहेत". 


आता पुढच्या आठवड्यात कोण राहील? कोण जाईल? कोण होईल कॅप्टन? कोण होईल नॉमिनेट? कोण होईल सेफ? याकडे बिग बॉसच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरामधून रुचिरा जाधव बाहेर!; चाहते म्हणाले,"आता रोहितचं काय होणार?"