मुंबई : एबीपी माझावरील ‘रंग माझा वेगळा’च्या या पर्वाची विनर ठरली सैराट फेम रिंकू राजगुरु. रसिका सुनील, अक्षया देवधर, स्मिता शेवाळे, शर्वरी लोहकरे, हेमांगी कवी, ऋता दुर्गुळे, भाग्यश्री लिमये आणि सुरुची अडारकर या नायिकांना मागे टाकत रिंकू राजगुरु विजयी ठरली.


नऊ नायिकांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत प्रत्येकीला 1500 रुपयांचं बजेट देण्यात आलं होतं. 1500 रुपयांत कपडे, मेकअप, दागिने आणि चप्पल या चार गोष्टी घेत जी नायिका जास्तीत जास्त पैशांची बचत करेल ती ठरणार होती रंग माझा वेगळाची शॉपिंग क्वीन.

फक्त एवढंच नाही तर या नायिकांना यंदा शॉपिंगसोबतच एक अनोखा टास्क देण्यात आला होता आणि तो होता रंगाचा. कोणत्याही एका रंगाची निवड करत त्याच रंगाच्या चार वस्तू या नायिकांना खरेदी करायच्या होत्या.

रिंकूने हे आव्हान स्वीकारत अकलूजमध्ये मनसोक्त शॉपिंग केलं, अर्थात बजेटचं भान राखत. रिंकूने एकूण खरेदी केली 110 रुपयांची आणि वाचवले तब्बल 1390 रुपये. महागाईच्या काळातही स्मार्ट शॉपिंग करत रिंकून पैसे बचतीचा गुरुमंत्रच तमाम गृहिणींना दिला.

रिंकू राजगुरुला तगडी टक्कर मिळाली ती अभिनेत्री सुरुची अडारकरची. सुरुचीने 127 रुपयांची खरेदी करत 1373 रुपयांची बचत केली. स्पर्धा खूपच अटीतटीची होती आणि यात अव्वल ठरली सर्वांची लाडकी आर्ची अर्थात रिंकू राजगुरु.



रिंकूनंतर सर्वात जास्त बचत केली ती अभिनेत्री सुरुची अडारकरने. सुरुचीने 127 रुपयांची खरेदी करत 1373 रुपयांची बचत केली. स्मिता शेवाळे आणि 'घाडगे अॅण्ड सून' फेम भाग्यश्री लिमयेच्या खरेदीत तर अवघ्या 5 रुपयांचा फरक आहे. भाग्यश्रीने खरेदी केली 280 रुपयांची तर स्मिताने खरेदी केली 275 रुपयांची.

शनाया म्हणजेच रसिका सुनीलनेही हे अनोखं अाव्हान स्वीकारत ठाण्याचं मार्केट पालथं घातलं. रसिकाने 305 रुपयात वस्तू घेत तब्बल 1195 रुपये वाचवले. हेमांगी कवीने शॉपिंग केली 340 रुपयांची तर ऋता दुर्गुळेने खरेदी केली 550 रुपयांची. पाठकबाई अर्थात अक्षया देवधरने मात्र बचतीचा फार विचार न करता 1215 रुपयांची मनसोक्त शॉपिंग केली.

'रंग माझा वेगळा'ची स्पर्धा खुपच अटीतटीची होती आणि यात अव्वल ठरली सर्वांची लाडकी अार्ची अर्थात रिंकू राजगुरु. विजेत्या रिंकूला बक्षीस म्हणून तमाम महिलांची आवडती पैठणी देण्यात आली.

नायिका      शॉपिंग     बचत

रिंकू            110              1390

सुरुची         127            1373

अक्षया       1215             285

शर्वरी         640             860

हृता           550             950

भाग्यश्री     280           1220

हेमांगी      340            1160

स्मिता       275           1225

शनाया     305           1195



'रंग माझा वेगळा'चे सर्व एपिसोड एकाच ठिकाणी

https://www.youtube.com/playlist?list=PLh0Ol8Y0tIRR2WnyBb9_d_ofzwgMw0Z3V