Reshma Shinde: मराठी मालिका विश्वात प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली आपल्या सोशिक अभिनयानं भूरळ घालणारी अभिनेत्री रेशमा शिंदे सध्या चर्चा आहे तिच्या लग्नाच्या बातमीमुळं. मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत रेशमानं लग्नाविषयी चाहत्यांचं कुतुहल जिवंत ठेवलंय. अद्याप तिनं  नवरदेव कोण हे उघड केलं नसल्याचं चाहते तिला सोशल मीडियावर नवरा कोण? किती सरप्राईज देणार अशा कमेंटस करत आहेत. आपल्या मैत्रिणींसोबत रेशमा धमाल करताना दिसत आहे. मेरे सपनो का राजकुमार आ रहा है असं म्हणत तिनं मैत्रिणींसोबत केलेली मजा चाहत्यांना शेअर केली आहे. यावरही चाहते तो लकी मुलगा कोण आहे? अशा कमेंट रेशमाला करत आहेत. शुभेच्छांचा भरभरून वर्षाव तिच्या पोस्टवरती होताना दिसतोय.


मेहंदी रंगली गं...


रंग माझा वेगळा, घरोघरी मातीच्या चुली यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री रेशमा शिंदे ही सध्या लग्नाच्या धामधुमीत व्यस्त आहे. रेशमानं तिच्या लग्नाचे अपडेट्स देणाऱ्या अनेक पोस्ट चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. नुकतीच तिनं आपल्या मेहंदी समारंभाची एक पोस्ट चाहत्यांशी शेअर केली आहे. यात नवऱ्याच्या हाताशेजारी आपला हात ठेवत तिनं फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे हातावरच्या मेहेंदीतून तिनं आपल्या लग्नाची तारीख रिव्हिल केली आहे. रेशमाच्या हातावरच्या मेहेंदीवर २९ नोव्हेंबर असं एका कोपऱ्यात लिहिल्याचं दिसतंय. त्यामुळं हीच त्यांच्या लग्नाची तारीख असल्याचं चाहते अंदाज बांधतायत.


 






मैत्रिणींसोबत धमाल


काही दिवसांपूर्वी रेशमानं तिच्या खास मैत्रिणीसोबत धमाल करताना दिसली. अभिज्ञा भावे, अनुजा साठे यांच्यासोबत कोरियन जेवणाचा आस्वाद घेत त्यांनी एक व्हिडिओही चाहत्यांना शेअर केलाय. रेशमा तिच्या साधेपणात असलेली नजाकत आणि अभिनयातील प्रामाणिकपणामुळे तिला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळवत असते. रेश्मा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी बोलते, पण तिच्या लग्नाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत, तिच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रेश्माने आपल्या होणाऱ्या जोडीदाराविषयी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि तर्क लावण्याची स्पर्धा सुरू आहे. काही जणांनी तर सोशल मीडियावर थेट विचारल्यावरही रेश्माने हसून विषय टाळला आहे.