Kitchen Kallakar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमामध्ये अभिनय क्षेत्रातील कलाकारांसोबतच राजकीय क्षेत्रातील काही नेते मंडळीदेखील हजेरी लवतात. नुकतीच या कार्यक्रमामध्ये रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी हजेरी लावली. किचन कल्लाकार हा एपिसोड आज (23 जून) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या एपिसोडचे काही प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रामदास आठवले त्यांच्या विनोदीशैलीनं कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांना खळखळून हसवताना दिसत आहेत.
रामदास आठवले यांची भन्नाट कविता
एका व्हिडीओमध्ये दिसते की, या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे हा रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांना एक प्रश्न विचारतो. तो विचारतो की, 'भाजी आणण्यासाठी रामदास आठवले हे तुमची कधी मदत करतात का? यावर सीमा आठवले या उत्तर देतात, 'तेच आणतात भाजी'. यानंतर रामदास आठवले एक भन्नाट कविता सादर करतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ
प्रशांत दामले आणि रामदास आठवले यांच्यामध्ये रंगणार गप्पा
किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये अभिनेता प्रशांत दामले हे रामदास आठवले यांच्याकडून खवय्ये नगरीच्या प्रगतीसाठी टिप्स द्यायला सांगितात. यावेळी रामदास आठवले म्हणतात, 'झी-टिव्हीचे आणि माझे जमले आणि इथे आले दामले' आज रात्री 9.30 हा एपिसोड प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये येऊन हे कालकार आणि नेते मंडळी वेगवेगळे पदार्थ तयार करतात. या कार्यक्रमाचे परीक्षण हे अभिनेते प्रशांत दामले हे करतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
हेही वाचा:
- Kitchen Kallakar : बिग बॉस ते निवडणुकीच्या रणांगणात झळकणारा अभिजीत बिचुकलेची एन्ट्री किचन कल्लाकारच्या मंचावर, तृप्ती देसाईदेखील येणार
- Dance Maharashtra Dance : 'किचन कल्लाकार' घेणार प्रेक्षकांचा निरोप? ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ होणार सुरू