Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची महागायिका वैशाली माडे यांच्या म्युझिक ॲकाडमी लाँच कार्यक्रमाला हजेरी लावली. राज ठाकरे यांच्या हस्ते म्युझिक ॲकाडमीचं उद्घाटन करण्यात आलं. यामुळे आता सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे एका नवीन भूमिकेत दिसणार आहे. आजपासून वैशाली माडेच्या म्युझिक ॲकाडमीची सुरूवात सुरू झाली आहे. या ॲकाडमीमध्ये संगीत शिकणाची इच्छा असणाऱ्यांना संगिताचं संपूर्ण शिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल. 


वैशाली माडेनी काढली राज ठाकरे यांची नजर


गायिका वैशाली माडेच्या संगीत ॲकाडमी लाँचला राज ठाकरे पोहोचले. यावेळी वैशाली माडे यांनी त्यांचं स्वागत केलं. वैशाली माडे यांनी राज ठाकरे यांना टिळा लावून त्यांचं औक्षण केलं. यानंतर वैशाली माडेने त्यांची बोटं मोडून त्यांची नजर काढली. यावेळी वैशाली माडेने म्हटलं की, राज ठाकरे मराठी कलाकाराच्या नेहमी पाठीशी उभे असतात, त्यांनी मलाही नेहमी साथ दिली आहे.


राज ठाकरे नेहमी मराठी कलाकारांच्या पाठीशी


वैशाली माडे (Vaishali Made) हिने यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आज माझी ही म्युझिक ॲकाडमी सुरू होत आहे आणि याचा आनंद आहे. माननीय राज साहेब ठाकरे हे नेहमी माझ्या पाठीशी उभे आहेत आणि ते आताच नाही तर माझ्या सुरुवातीच्या दिवसापासून आहेत. राजसाहेब मराठी कलाकारांसाठी नेहमीसोबत असतात. त्यांचं इथे येणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला संगीत शिकता आलं पाहिजे, हाच माझा हेतू आहे, जी लोक इथे येऊ शकत नाही त्यांना मी ऑनलाईन संगीत शिकवणार आहे.


नजर काढून बोटं मोडली






राज ठाकरेंचं जल्लोषात स्वागत


मनसैनिकांकडून राज ठाकरे यांच्या गोरेगावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गायिका वैशाली माडे यांच्या म्युझिक ॲकाडमी लाँचसाठी आज राज ठाकरे गोरेदावमध्ये दाखल झाले होते. यावेळी मनसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी वैशाली माडे यांनीही कार्यक्रमासाठी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी ढोल-तुतारी वाजल्याचं पाहायला मिळालं.


महत्वाच्या इतर बातम्या :


Shweta Tiwari Birthday : 500 रुपये महिना पगार, आज एका प्रोजेक्टसाठी कमावते कोट्ववधी रुपये; वयाच्या चाळीशीतही तरुणाईला लाजवेल असं सौंदर्य